Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींवर जन आंदोलनाची तयारी!

ATISH BHOIR
Jun 27, 2025 02:32:35
Kalyan, Maharashtra
65 बेकायदा इमारती प्रकरण.. गुन्हे कामगारांवर, मुख्य बिल्डर व बनावट कागदपत्र करणारे आरोपी गुन्हे दाखल नसल्याने मोकाट — प्रशासनाकडून दुर्लक्ष मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली ते वेळ देत नसतील, तर 65 बेकायदा इमारतीतील बेघर होणाऱ्या शेकडो नागरिकांना घेऊन मोठ जन आंदोलन उभारून मंत्रालयावर नेणार ... शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे.यांचा इशारा Anc... डोंबिवलीतील 65 बेकायदेशी इमारतीना पालिकेकडून पुन्हा नोटीस बजावल्यानंतर ठाकरे गटा क्रमांक झाले असून . डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर 65 इमारती प्रकरणातील जे गुन्हे दाखल झाले आहेत त्या गुन्ह्यांवर आक्षेप घेत हे गुन्हे तिथे काम करणारा प्लंबर, फिटर, कामगार, मिस्त्री , अशा व्यक्तींवरती गुन्हे दाखल असून . या इमारती उभारणारे मुख्य बिल्डर आणि जे बोगस रेराचे कागदपत्र बनवणारे मुख्य आरोपी वर गुन्हा दाखल न केल्याने ते बिदास्त मोकाट फिरत असल्याचा आरोपकरण्यातआला आहे .या बिल्डर आणि बोगस कागदपत्र तयार करणारे लोक आहेत यांच्यावरती कुठल्या राजकीय पक्षाचा वरदहस्त आहे आणि याला कोणी यांना वाचवतोय याचा पोलिसांनी शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. आशा आरोपी लोकांना प्रोटेक्ट केलं जातं आणि या 65 बेकायदा इमारतीतील लोकांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे . तरी प्रशासन याची दखल घेत नाही. या लोकांचे लोन सुरू आहेत आणि बँक अजून त्यांच्याकडून दर महिना हप्ते घेत आहेत.आज या लोकांना महापालिका कडून दररोज नोटीस बजावित आहेत.त्यामुळे या लोकांमध्ये भीतीच वातावरण आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका हीच असणारे की या 65 बेकायदा इमारतीच्या लोकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहणार आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असून त्यांनी वेळ दिली नाही किंवा त्यांना काही कारणावरून वेळ नाही देता आलातर कल्याण आणि डोंबिवलीमध्ये 65 बेकायदा इमारतीतील बेघर होणाऱ्या नागरिकांना घेऊन एक मोठं जनआंदोलन आम्ही शिवसेना पक्षाच्यावतीने छेडणार असून आणि मंत्रालयापर्यंत हे जन आंदोलन घेऊन जाणार असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे. Byte - जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement