Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

सासरच्या जाचामुळे विवाहित महिलेने घेतला आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल!

VAIBHAV BALKUNDE
Jun 27, 2025 04:32:35
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या.... सासरच्या मंडळी विरुद्ध औराद शहाजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.... AC ::-  एका विवाहित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळी विरुद्ध औराद शहाजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंगा तालुक्यातील लांबोटा येथील सुनीता यांचा विवाह २००५ मध्ये निलंगा तालुक्यातील हंगरगा शिरशी येथील जीवन दादाराव कुंदिले यांच्यासोबत रीति रिवाजाप्रमाणे झाला होता. दरम्यान त्यांचे पती, सासू, नणंद व इतर नागरिकांनी मिळून सुनीता यांचा छळ करण्यास सुरुवात केली. नेहमीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून सुनीता यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement