Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

केलखाडीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रशासनाने घेतली महत्त्वाची दखल!

PRASHANT PARDESHI
Jul 01, 2025 04:36:47
Dhule, Maharashtra
anchor - नंदुरबार जिल्ह्यातील केलखाडी येथे शाळकरी मुलांचे शिक्षणासाठीचे हाल दाखवणारी बातमी झी 24 तास दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याची दाखल घेतलेली आहे. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी याबाबत ठोस भूमिका घेत, पीडब्ल्यूडी विभागाचे पथक त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहण्यासाठी पाठवले. तसंच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी सुविधा व्हावी यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा लोखंडी पूल उभारन्याय येईल, असं त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येणारे दिवसांमध्ये या ठिकाणी कायमस्वरूपी पूल उभारण्यात येणार असल्याची ही माहिती मिताली सेठी यांनी दिलेली आहे. झी 24 तास च्या बातमी नंतर आता केलाखडी तील समस्या सुटायला मदत होणार आहे. अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरावा लागत आहे. नदीवर पूल नसल्याने आणि रस्त्याचा अभाव असल्याने या विद्यार्थ्यांना झाडांच्या फांद्या पकडत नदी पार करावी लागते. स्वातंत्र्यापूर्वीपासून रस्ता नसल्याची ही परिस्थिती आजही तशीच असून, या मुलांचा शिक्षणासाठीचा प्रवास अक्षरश जीवघेणा ठरत आहे. याबाबतचे वृत्त झी २४ तासने दाखल नंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे byte - मिताली शेठी, जिल्हाधिकारी प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement