Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट, सावध रहा!

HARSHAD PATIL
Jul 06, 2025 06:35:50
Palghar, Maharashtra
पालघर - पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले आहेत. धामणी आणि कवडास धरणांमधून सूर्या नदीत चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे . दरम्यान नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement