Back
मालाडमध्ये नायजेरियन तस्कर गजाआड, 200 ग्रॅम कोकेन जप्त!
Mumbai, Maharashtra
अँकर -- मालाड पश्चिम भागात "कोकेन" या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या नायजेरियन नागरीकाला गजाआड केल आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट चे पथकास मालाड
जे पी कॉलनी, ऑरलेम मार्वे रोड, या ठिकाणी संशयास्पदरित्या वावरत असलेल्या एका परदेशी इसमाला अटकाव करून झडती घेतली असता त्याचेकडे २०० ग्रॅम वजनाचा 'कोकेन' हा अंमली पदार्थ मिळून आला तो जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे अंदाजे रुपये दोन कोटी एवढे मुल्य आहे. तसेच अंमली पदार्थ विक्रीसाठी वापरलेली होंडा सिवीक मो/कार व तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच तो वैद्य कागदपत्राशिवाय भारतात रहात असल्याचे उघडकीस आले असून त्याची गुन्हेगारी पर्षभूमी सुद्धा आल्याचे समोर आले आहे.
'कोकेन' हा अंमली पदार्थ उत्तेजक अंमली पदार्थ असुन ज्यामुळे मतिभ्रम निर्माण होऊ शकतो. अंमली पदार्थसह ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुद्ध एनडीपीएस अॅक्ट १९८५ व परदेशी नागरीक कायदा १९४६ अन्वये गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आलेली आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.
मनोज कुळकर्णी
Vdo attach २C
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement