Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

पनवेलमध्ये फुटपाथवर आढळलं नवजात बाळ, धक्कादायक चिठ्ठी सापडली!

PRAFULLA PAWAR
Jun 28, 2025 03:05:57
Raigad, Maharashtra
स्लग - रस्त्याच्या कडेला फुटपाथवर आढळले नवजात बालक ..... पेटीमध्ये ठेवण्यात आले होते नवजात बालक ..... पनवेल शहरातील तक्का भागांतील धक्कादायक प्रकार ..... मुलींच्या बालगृहा बाहेर सोडण्यात आलं बाळ ...... स्थानिकांनी बाळाला रुग्णालयात नेलं ...... बाळासोबत इंग्रजी भाषेतील चिठ्ठी आणि बेबी फिडिंग ...... अँकर - पनवेल शहरातील तक्का परिसरात फूटपाथ वर आज सकाळीच एक नवजात अर्भक आढळून आलं आहे. एका चांगल्या पेटीमध्ये हे बाळ फुटपाथच्या कडेला ठेवण्यात आलं होतं. याच परिसरात स्वप्नालय नावाचं मुलींचं बालगृह आहे. त्याच्या बाहेरच्या बाजूलाच रस्त्यालगत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हे नवजात बालक इथं रडत होतं सकाळी कामानिमित बाहेर पडलेल्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. चांगल्या वस्तीत हा प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिकांनी आता या बाळाला रुग्णालयात नेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या बाळासोबत एक इंग्रजी भाषेतील चिठ्ठी आणि बाळासाठी बेबी फिडिंग देखील ठेवण्यात आलं होतं. पोलिस रुग्णालयात पोहोचले असून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. बाईट 1 - स्थानिक रहिवासी बाईट 2 - स्थानिक रहिवासी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement