Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

मराठवाड्यात पावसाची नवी आशा! शेतकऱ्यांचा जीव भांड्यात!

VISHAL KAROLE
Jun 30, 2025 03:00:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn rain prediction av feed attached ANCHOR: मराठवाड्यात 1 ते 5 जुलै रोजी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग ताशी 30 किमी राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी यंदा मे महिन्यात मोठ्याप्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसाच्या भरवशावरच जवळपास शेतकऱ्यांनी 50 टक्के पेरण्या उरकल्या होत्या. दरम्यान, पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या धोक्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाद्वारे पिकाला पाणी देण्यास सुरुवात केली होती. दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता. दरम्यान, आता 1 जुलैपासून 5 दिवस मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात 3 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी,, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरी एवढे 4 ते 10 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement