Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक महापालिका निवडणुकीत १५ हजार मतदारांची वाढ, उमेदवारांचा कस लागणार!

Sagar Gaikwad
Jun 28, 2025 03:30:56
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_voting प्रभागात आता १५ हजार मतदारसंख्या वाढल्याने उमेदवारांचा लागणार कस अँकर यंदाच्या नाशिक महापालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागात सुमारे १५ ते २० हजार मतदारसंख्या वाढण्याच्या शक्यतेमुळे उमेदवारांचा कस लागणार आहे. गेल्या २०१७ च्या महपालिका निवडणुकीत एका प्रभागासाठी सरासरी चाळीस हजार मतदारांचा प्रभाग होता. परंतु गत सात वर्षात मतदारसंख्या वाढली आहे. २०१९ व २०२४ दोन लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्याने मतदारसंख्या थेट पावणे चौदा लाखांपर्यंत गेली आहे... परिणामी महापालिकेच्या एका प्रभागातील सरासरी मतदारसंख्या थेट पंचावन्न हजारांच्या पुढे जाणार आहे... सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ओबीसी आरक्षण प्रकरण आणि विविध न्यायालयीन अडथळ्यांमुळे पालिकेच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या.. शहरातील मतदारसंख्याही वाढली असून, प्रत्येक प्रभागात सरासरी चौदा ते पंधरा हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०११ च्या जनगणनेच्या आधारे प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. २०१७ च्या महापालिका निवडणुकीवेळी १० लाख ७३ हजार ४०७ मतदारसंख्या होती. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात मिळून ती १२ लाखांपर्यंत गेली आहे. महापालिका निवडणूक येईपर्यंत यात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील सरासरी मतदारसंघ थेट पन्नास हजारांच्या पार जाणार आहे. 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement