Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक, काय आहे कारण?

YKYOGESH KHARE
Jul 10, 2025 04:01:44
Nashik, Maharashtra
nsk_tahsildaraarest feed by 2C anchor जन्मप्रमाणपत्र घोटाळ्यातील संशयित निलंबित नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना दाखल दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तहसीलदार विशाल सोनवणे यांनी जानेवारी २०२५ मध्ये छावणी पोलिस ठाण्यात बनावट जन्मप्रमाणपत्रप्रकरणी पहिला गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात नायब तहसीलदार धारणकर यांना आरोपी करण्यात आले आहे. पदाचा गैरवापर करत कागदपत्रांची शहानिशा न करता आर्थिक लाभासाठी जन्मप्रमाणपत्र दिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेल्याने धारणकर दाम्पत्याला पोलिसांनी गेल्या महिन्यात नाशिकमधून अटक केली. सध्या पहिल्या गुन्ह्यात धारणकर व त्यांच्या पत्नी दीपाली हे न्यायालयीन कोठडीत होते.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top