Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

मुंबई विद्यापीठ उपकेंद्राची दुरावस्था: सिनेट सदस्यांनी दिली तंबी!

ATISH BHOIR
Jul 04, 2025 01:31:18
Kalyan, Maharashtra
Mumbai University' Sub-Centre Senate members visit मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रास सिनेट सदस्यांची अचानक भेट पाहाणी दरम्यान अनेक तृटी व उपकेंद्राची दुरावस्था आली समोर... Anc..शिवसेना नेते युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य व शिवसेना उपनेत्या शितल शेठ देवरुखकर, प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रास अचानक भेट दिली असता या उपकेद्रात अनेक त्रुटी आढळून आल्या. तसेच उपकेंद्राचे उद्घाटन झाले तेव्हापासून कोणतीही प्रगती या केंद्राची झाली नसल्याचे बाब देखील पाहणीत निदर्शनास आली. या ठिकाणी केंद्र प्रमुखाची नेमणुक कायमस्वरुपी नाही. ठाणे येथील महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या संकुलाला फक्त एकच स्वच्छता कर्मचारी. जागोजागी स्वच्छतेचा अभाव. इमारतींची दुरावस्था अशा अनेक समस्या या उपकेंद्रात दिसून आल्या. तसेच व्यवस्थापन परीषद सभेत धर्मवीर आनंद दिघे च नाव देण्याचा ठराव मंजुर होऊन देखील अद्याप नाव देण्यात आलेले नाही. अशा अनेक बाबी सिनेट‌ सदस्यांना निदर्शनास आल्या. पुढील दोन दिवसात आनंद दिघे यांच्या नामकरणाचा फलक लागला नाही तर युवासेनेच्या वतीने नामकरण सोहळा करु अशी तंबी सिनेट‌ सदस्यांनी केंद्राला दिली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement