Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar411030

मोहरम मिरवणूक: अहिल्यानगरमध्ये भव्य सवारीसाठी लाखोंची गर्दी!

LAILESH BARGAJE
Jul 06, 2025 12:06:32
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- मोहरम मिरवणूक फीड 2C अँकर:- राज्यासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर शहरातील मोहरम उत्सवातील सवारी विसर्जन मिरवणुकीला दुपारी बारा वाजता कोठला येथून प्रारंभ झाला आहे. कोठला परिसरामध्ये सवारीचे प्रदक्षिणा झाल्यानंतर सवारी कोठला परिसरातून निघून शहरातील विसर्जन मार्गावर निघते. ही मिरवणूक रात्र 8 वाजेपर्यंत चालते मिरवणूकीत सवाऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली पाहायला मिळाली. यासोबत मोहरमच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला असून यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात दोन अपर पोलीस अधीक्षक, चार पोलीस उपअधीक्षक, ६५ अधिकारी आणि ८२० अंमलदार यांचा समावेश आहे. शहरात सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवले जाणार आहे. शहरात मोहरमच्या पार्श्वभूमीवर 439 लोकांना हद्दपार करण्यात आले आहे, ज्यामध्ये कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील लोकांचा समावेश आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement