Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये मोटारसायकल चोरांची धडाकेबाज अटक, सात चोरलेल्या बाईक जप्त!

GANESH MOHALE
Jul 06, 2025 06:32:40
Washim, Maharashtra
वाशिम: File:0607ZT_WSM_THIEVES_ARRESTED रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.या कारवाईत दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल सात चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.योगेश गिरी (वय २४, रा. लाखाळा, वाशिम) आणि त्याचा साथीदार विष्णुदास झाटे (वय २५, रा. पिंपळगाव, ता. मंगरुळपीर) असे आरोपीचे नांव असून हे दोघेही वाशिमसह परिसरातील विविध भागांतून मोटारसायकल चोरी करत असल्याची कबुली त्यांनी तपासादरम्यान दिली आहे.या कारवाईमुळे वाशिम शहरासह परिसरात घडलेल्या अनेक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडल्यामुळे त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement