Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर यांची अचानक रुग्णालय भेट, अव्‍यवस्‍थेचा पाढा वाचला!

PRAFULLA PAWAR
Jun 27, 2025 02:00:13
Raigad, Maharashtra
स्‍लग - आरोग्‍य राज्‍यमंत्री बोर्डीकर यांची जिल्‍हा रूग्‍णालयाला अचानक भेट ........ रूग्‍णांच्‍या नातेवाईकांनी वाचला अव्‍यवस्‍थेचा पाढा अँकर - आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर रायगडच्‍या दौरयावर असताना त्‍यांनी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट दिली. तेथील रुग्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी तसेच स्थानिक कार्यकर्त्‍यांनी मंत्र्यांसमोर रुग्णालयातील अव्‍यवस्‍थेचा पाढाच वाचला. यावेळी रुग्णालयातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. रुग्णांची संख्या अधिक असल्याने रुग्णालयाची विद्यमान इमारत अपुरी पडत असल्याचे यावेळी त्यांना प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. रुग्णालयावर कामाचा ताण असला तरी रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहीजे असे निर्देश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement