Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

मंत्री छगन भुजबळ अचानक येवला शहरात, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या!

Sudarshan Khillare
Jun 28, 2025 01:32:07
Yeola, Maharashtra
अँकर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरात ना सुरक्षा व ना ताफा घेत अचानकपणे एका साध्या गाडीत फिरून येवला शहरातील समस्या जाणून घेतल्या. मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी आपल्यासोबत कुठलाही ताफा सोबत न घेता साध्या गाडीत येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक लोणारी यांना सोबत घेऊन शहराची पाहणी केली. विठ्ठल नगर भागात चिखलमय रस्त्यांची भुजबळांनी पाहणी केली दोन दिवस आधीच झी 24 तास वर या भागातील रस्त्यांच्या समस्या संदर्भात बातमी दाखवण्यात आली होती या बातमीची दखल घेत भुजबळांनी अचानकपणे या भागाला भेट देऊन समस्या जाणून घेतली स्वतः मंत्री आपल्या दारी आल्यानंतर नागरिकही भारावून गेले नागरिकांनी भुजबळांना आपल्या समस्या सांगितल्या यावेळी सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. सोबत झी24तास च्या बातमीची क्लिप दिलेली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement