Back
जालना: घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक, 8 लाखांचे दागिने जप्त!
NMNITESH MAHAJAN
FollowJul 03, 2025 02:34:05
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0307ZT_JALNA_ARREST(4 FILES)
जालना : घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना घेतलं ताब्यात, 8 लाख 20 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त
बिड, पुण्यातून आरोपींना घेतलं ताब्यात
Anchor: जालन्यातील अंबड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केलीय.या आरोपींनी 6 दिवसांपूर्वी अंबड शहरातील ओम शांती कॉलेजजवळ असलेलं कुटुंबाच्या घरात कुलूप तोडून चोरी करत घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण 11 लाख 13 हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी अंबड पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता यातील मुख्य आरोपी शेख अशपाक शेख आसिफ हा बीड जिल्ह्यातील पेठ बिड पोलीस ठाण्याच्या हददीत लपुन बसलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल.ही चोरी त्याने शेख कलीम शेख अलीम या साथीदारासह केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी शेख कलीम शेख अलीम याला शिक्रापुर पुणे या ठिकाणाहून अटक केली.आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह 8 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करत आरोपी विरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बाईट:संतोष घोडके,पोलिस निरीक्षक अंबड,जालना
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 19, 2025 05:05:09Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1907ZT_MAVAL_DOG_ISSUE
Total files : 04
Headline -तळेगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नागरिक त्रस्त
-नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
Anchor:
तळेगाव दाभाडे शहरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा त्रास सर्वच प्रभागांतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या चाव्याचे प्रकार घडले असून अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. नाना भालेराव कॉलनीसह; अनेक भागांत भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, या कुत्र्यांमुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉलनीतील रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणारा कचरा हे कुत्रे सैरावैरा पसरवतात, ज्यामुळे परिसरात घाण पसरते आहे. यापूर्वी नगर परिषदेने कोट्यवधी रुपये खर्चुन कुत्र्यांची नसबंदी केली होती. मात्र, तरीही त्यांची संख्या वाढतच आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील भटकी कुत्री पकडून मावळातील तळेगांव परिसरात सोडल्या जातात विजय मारुती खिंडजवळ भटकी कुत्री ही कुत्री पुढे तळेगाव शहरात पसरतात आणि त्यामुळे शहरातील संख्या झपाट्याने वाढते आहे. रात्रीच्या वेळी अंधाऱ्या व सुनसान रस्त्यांवरून जाताना कुत्र्यांचा अचानक हल्ला होण्याचे प्रकार वाढले असून, अनेक वाहनचालक अपघातग्रस्त झाले आहेत. काही नागरिकांना चावल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. शहरात कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी वारंवार मागणी, अरुण माने, सचिन भांडवलकर हे सजग नागरिक करत आहे. मात्र, नगरपालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
8
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 19, 2025 05:02:06Kolhapur, Maharashtra:
Kop Kshirsagar
Feed :- 2C
Anc :- शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांच्या विरोध असताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर गैरसमज पसरवत असल्याचा आरोप शक्तिपीठ कृती समितीने केला आहे.. इतकच नाही तर राजेश क्षीरसागर याना शक्तिपीठासाठी जमीन हवी असल्यास त्या बदल्यात जयप्रभा स्टुडिओ ची मालकी शेतकऱ्यांच्या नावावर करावी अशी मागणी करत निमशिरगाव इथं क्षीरसागर यांच्या विरोधात आंदोलन केलय. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची मालकी क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि अन्य भागीदारांच्या मालकीची आहे. हाच मुद्दा हेरून क्षीरसागर यांची राजकीय कोंडी करण्याच्या उद्देशाने शक्तिपीठ विरोधी कृती समितीने जयप्रभा स्टुडिओचा मुद्दा समोर आणले आहे. दरम्यान आज राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शक्तीपीठ समर्थक शेतकरी, जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये बैठक होणार आहे.
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 19, 2025 05:01:57Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1907ZT_MAVAL_LON_TRAFFIC
Total files : 03
Headline : लोणावळ्यात बेशिस्तपणे वाहन पार्क करून गेल्यास पोलीस दंडात्मक कारवाई करणार
Anchor:
मावळातील लोणावळ्यात सर्वात जास्त पर्जन्यमान बरसतो, त्यामुळे पुणे मुंबईकरांची पाऊले लोणावळ्याकडे वळू लागली असून, विकएंड चं अवचित साधत पर्यटनासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल होऊ लागलेत, त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने, जुना पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी लोणावळा शहर पोलीसांनी कडक पाऊले उचलली असून, बाहेरून आलेले पर्यटक लोणावळ्यात दाखल होताच चिक्की घेण्यासाठी चिक्की दुकानाच्या बाहेर चार चाकी वाहने उभे करतात त्यामुळे अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते त्यामुळे लोणावळ्यातील कुमार चौकात वाहनांची गर्दी पहायला मिळते. या चौकात वाहतूक कोंडी झाली तर सर्व ताण वाहतूक पोलिसांवर येतो त्यामुळे लोणावळा वाहतूक विभागाचे कर्मचारी भर पावसात वाहतूक नियंत्रण करतात त्यासाठी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी स्थानिक चिक्की दुकानदार तसेच पर्यटकांना दंडात्मक कारवाईचा इशारा दिलाय पर्यटकांनी आपली वाहने सुरक्षित पार्किंग करूनच खरेदीसाठी गाडीच्या बाहेर पडावं पर्यटन नगरीत वर्षविहारासाठी पर्यटक, भुशी धरण, टायगर पॉईंट, सहारा ब्रिज पॉईंट धबधबे ला जास्त पसंती देतात. मात्र पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी पर्यटकांनी आपली वाहने व्यवस्थित पार्क करावी..
बाईट : राजेश रामाघरे, पोलीस निरीक्षक लोणावळा शहर पोलीस (file no.03)
0
Share
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 19, 2025 05:01:42Mira Bhayandar, Maharashtra:
Date-19july2025
Rep-prathamesh tawade
Loc-bhayander
Slug-BHAYANDER CLUSTER
Feed send by 2c
Type-AvB
Slug- मिरा भाईंदर मध्ये जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
क्लस्टर डेव्हलपमेंट च्या अटी शिथिल
अँकर - मीरा भाईदर शहरात इमारतींच्या पुनर्विकासाठी अडथळा ठरणारया क्लस्टर डेव्हलपमेंटचा ( समुच्चित)
मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
मीरा भाईंदर शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी पलीकडेकडून स्वतंत्र परवानगी दिली जात नव्हती , त्यामुळे या
इमारती व नागरिकांच्या अस्तित्वाचा प्रश्र्न निर्माण झाला होता,
मात्र नुकत्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मीरा भाईंदर मध्ये क्लस्टर योजनेच्या अटी शिथिल करण्याच्या सूचना प्रधान सचिवांना दिल्या आहेत… त्यामुळे आता मीरा भाईंदर मधील स्वतंत्र इमारतीच्या पुनर्बीकासाचा मार्ग मोकळा झाला आहे .. मीरा भाईंदर चे आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत ही माहीती दिली आहे…
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 19, 2025 05:01:34Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1907_BHA_ACCUSED_BAIL
FILE - 7 VIDEO
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला...आरोपी अद्यापही फरार...
Anchor ;- भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरातील नामांकित श्याम हॉस्पिटल येथील डॉ.देवेश अग्रवाल याने ९ जुलैला एका अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केले होते.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने साकोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी लैंगिक छळासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेच्या दिवसांपासून आरोपी डॉक्टर फरार आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा येथील जिल्हा आणि सत्र न्यायालय फेटाळला.आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल याच्या वकिलामार्फत भंडारा जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता.तो जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.आरोपी डॉक्टरने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात केलेल्या कृत्याचे साकोलीसह जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटले होते. त्याच्या अटकेसाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.मात्र अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने पोलिसाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
0
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 19, 2025 04:30:33Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1907ZT_BARAMTIAJI
FILE 4
अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर..... बारामती मधील सिद्धेश्वर मंदिरात घेतलं महादेवाच्या पिंडीचे दर्शन
Anchor_ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मधील विविध ठिकाणच्या विकास कामांची पाहणी केली आहे.
बारामती शहरातील सिद्धेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीच दर्शन घेत अजित पवार यांनी विकास कामाच्या पाहणीची सुरुवात केली आहे मंदिर परिसरातील विकास कामांबद्दल ही अजित पवार यांनी वेळी काही सूचना केल्या आहेत.
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 19, 2025 04:30:22Nashik, Maharashtra:
नाशिक
* आमदार सरोज अहिरे यांच्या जेलरोड येथील घरी चोरी..
* घरातील मोलकरणीने कपाटातून चोरले एक लाख रुपये..
* नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन मोलकरणीला अटक..
* याच मोलकरणीने वेळोवेळी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 19, 2025 04:30:16Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1907_BHA_FREE_STYLE
FILE - 2 VIDEO
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षानीच केली गावातील युवकाला जबर मारहाण... शेतकरी व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यात फ्री स्टाईल
Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील परसवाडा (देव्हाडी) येथील शेतीवर जाण्याच्या रस्त्यावरुन राडा झाला, गावातील अनेक शेतकरी आपल्या शेतावर रोवणी करण्यासाठी मागील सुमारे ७० वर्षांपासून प्रभाकरजी कडव यांच्या घराजवळुन आपल्या शेतावर शेतीचे रोवणी करण्यासाठी दर वर्षी जात असतात. मात्र रस्त्यावरून शेतकरी व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की शेतकरी व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यात हाणामारी झाली आहे... आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
0
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 19, 2025 04:03:52Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_THEFT
14 घरफोडी करणाऱ्या आरोपीला केले जेरबंद,धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
Anchor:धाराशिव शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी घरफोड्या करणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.धर्मेंद्र उर्फ काळ्या विलास भोसले अस आरोपीच नाव असुन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने धाराशिव जिल्ह्यातील मुरूम लोहारा नळदुर्ग व तुळजापूर परीसरात घरफोड्या केल्याचे त्याने कबुल केले.दरम्यान पोलिसांनी पोलिस गुन्हे अभिलेख तपासले असता त्यांच्याकडुन घरफोडीचे 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.तसेच चोरी केलेल्या मुद्देमालामधील 6 लाख 30 हजारांची सोन्याची लगड देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 19, 2025 04:03:35Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_KALAMBI
सातारा - साताऱ्यातील खटाव तालुक्यात कळंबी ते लक्ष्मीनगर या सुमारे ३ किमी रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या आधारे वडूज येथील नायब तहसीलदार तथा दंडाधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसह निवेदन दिले. नकाशात रस्ता नोंद असूनही प्रत्यक्षात अडथळ्यांमुळे रस्ता वापरणे कठीण झाले आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता खुला करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. निवेदन देताना ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 19, 2025 04:03:09kolhapur, Maharashtra:
2c ला दोन साउंड बाईट जोडले आहे...
-------
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकांचे प्रबोधन केले. समाज परिवर्तन केले. राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्यासाठी राष्ट्रभक्ती रुजवण्याचे काम केले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेय...त्याचवेळी महाराजांचे विचार सर्वव्यापी करण्यासाठी, नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित विदर्भास्तरीय खंजारी भजन स्पर्धेचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी गडकरी बोलत होते.
भजने मनोरंजनासाठी नाहीत, समाजावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आहेत. महाराजांच्या भजनांमध्ये हा भाव आपल्याला बघायला मिळतो, याचाही गडकरी यांनी उल्लेख केला. ग्रामविकास ही ग्रामगीतेची संकल्पना आहे. ग्रामीण भागाचा विकास कसा व्हायला हवा, आदर्श गाव कसे असावे हे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितले. पण हा विचार शब्दांपुरता मर्यादित न राहता आपल्याला कृतीमध्ये उतरवावा लागेल, असेही गडकरी म्हणाले. महाराजांनी त्यांच्या जीवनात कृषी विकास, स्वच्छता आदींचा विचार पोहोचवला. त्यांच्या गीतांनी, भाजनांनी आपण भारतीय आहोत, ही भावना रुजविण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.
-----
नागपूर
नितीन गडकरी, पॉइंटर...
- *आर्टिफिशियाल इंटेलिजन्सवर काम करत आहे... यात झाडाला उत्तम वाढ करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगल काम करत आहे..अमेरिकेमध्ये लागलेल्या सॅटॅलाइटच्या माध्यमातून शेतात असलेल्या संत्राच्या झाडाची परिस्थिती काय आहे हे कळणार आहे... तेही मोबाईलवर येणार आहे. त्यासाठी प्रत्यक शेतात मध्ये आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च आहे. तो खर्च कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जमिनीत पाण्याचा ओलावा किती आहे, याची यंत्र हे सॅटेलाईट सोबत कनेक्ट असणार आहेत. त्यावरून झाडाला तहान लागली आहे, हे कळेल आणि लगेच AI च्या माध्यमातून डीप इरिगेशनने पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल*.
- *झाडाला कुठल्या विटामिन्स कमी आहे. हे कळणार आहे. त्या झाडावर कुठला रोग येणार आहे आठ दिवसापूर्वीच कळेल त्यामुळे त्या माध्यमातून स्प्रे करता येईल*.
- स्पेन मधील व्हॅलेन्शियां आहे हे संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहर आहे.... तिथे एका एकरात 340 झाडं लावतात आणि 30 ते 40 टन उत्पादन घेतात.. आपल्या एका एकरात फक्त शंभर झाडे लावली जाते आणि 3 ते 4 टन उत्पादन होत. संत्राहा दर्जनाने पॅक करून विकतात. पण आपल्या संत्र्याची लूट होते..
- तिथं या सगळ्याच शूट केलं आणि नागपूरला आलं यावर ऍग्रो व्हिजन च्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना दाखवलं..
- *दाखवताना फुकट देण्याची किंमत होत नाही. माझा अनुभव खराब आहे.. जरी राजकारणात असलो तरी विचार स्पष्ट आहे गरज असेल तर मत द्या नाहीतर देऊ नका... (दारू) हे पाजणार नाही, आणि ते(मटन) खायला देणार' नाही".
- अडीचशे रुपये तिकीट लावल्यावरही साडे सहाशे शेतकरी आले. साडेचार तास त्यांनी व्हॅलेंशीया मधील संत्रा उत्पादनाचा तंत्र समजून घेतलं आणि त्याचा अवलंब केला... याचा परिणाम झाल.. शेतकऱ्यांनी ते तंत्रज्ञान अवलंबला सुरुवात केली आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसे वाढतील यासाठी प्रयत्नशील झालेले आहे.
- यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावल्यास उत्पादनात वाढ होईल आणि खऱ्या अर्थाने तुकडोजी महाराजांचे कृषी आणि ग्रामीण विकासाच स्वप्न पूर्ण होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 19, 2025 04:02:46Nashik, Maharashtra:
*विशाल मोरे, मालेगाव*
Anc: मालेगाव शहरात दुचाकी तयार करून स्क्रॅप करण्याची मोठी टोळी कार्यरत आहे. अशीच दुचाकी चोरी करणाऱ्या दोन जणांना मालेगाव पोलिसांनी पकडले आहे. मालेगाव पोलिसांनी पथक तयार करुन इसम नामे इरबाज मोहमद इम्रान व साद अख्तर आबिद अख्तर रयांना काल रात्री पकडले त्याच्याकडे गुन्हयातील गेलेली ७०,००० रुपये किमंतीची होन्डा युनीकॉन गाडी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी यापुर्वी देखील पवारवाडी पो.स्टे. गुन्हयातील २ व इतर मालेगाव शहरातील ७अशा एकुण १० मोटार सायकल त्यात ०२ यूनिकॉन, ४ बर्गमॉन, २ आरएनफाय, १ ड्रिमयुगा, १ एचएफ डिलक्स अशा गाड्या मिळून आल्या आहेत. गुन्हयाचा पुढील तपास API किरण पाटील हे करित आहे
0
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 19, 2025 04:02:31Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RAIN_LOSS एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
मेळघाटातील खापरा नदीला पूर; पुरामुळे नदीवरील पुल गेला वाहून, अनेक गावांमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही
अँकर :- गेल्या काही दिवसात अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे खापरा नदीला अचानक पूर आला. या पुराने नदीवरील पुल पूर्णपणे वाहून गेला असून मेळघाट मधील खडीमल, नवलगाव, बिच्छुखेडा, माडीझडप आणि चुनखडी या पाच गावात जाण्या येण्यासाठी वाहनांना रस्ताच उरला नाही. सोबतच सेमाडोह, धारणी, परतवाडा आणि चिखलदरा जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामांसाठी या मार्गाचा उपयोग करावा लागत असल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. पुरामुळे वाहून गेलेला पूल आधीच लहान व कमकुवत होता याकडे स्थानिकांनी वारंवार लक्ष वेधले होते. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अखेर खापरा नदिला पूर आला अन पुल वाहुन गेला. नागरिकांनी नवीन व मजबूत पुलाच्या तात्काळ बांधकामाची मागणी केली असून प्रशासनाने या मार्गाची लवकर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात आणखी अडचणी वाढू नयेत म्हणून तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 19, 2025 03:35:55Nashik, Maharashtra:
*मालेगाव ब्रेकिंग... विशाल मोरे*
मालेगावातील 16 वर्षीय तरुणी अत्याचार प्रकरण.
16 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपीचे वकीलपत्र घेण्यास मालेगावात हिंदू जनआक्रोश मोर्चाचा विरोध...
आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये मालेगावात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आवाहन..
वकीलपत्र घेणाऱ्यांना वकिलाला हिंदुंच्या रोषाला सामोरे जावे लागेल..
ज्याने कुणी आरोपीचे वकीलपत्र त्या वकिलाचा फोटो लावून काळे फसणार..
48 तासात आरोपीचे वकीलपत्र काढून घ्यावे अन्यथा जनक्रोशला सामोरे जावे लागेल असे दिले निवेदन
हिंदू जनआक्रोश मोर्चाचे मालेगाव मालेगाव वकील संघाला दिले निवेदन..
मालेगाव वकील संघाला निवेदन देत केली आरोपीचे वकील पत्र न घेण्याची मागणी..
*बाईट: डॉ चैतन्य देवरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धारकरी*
2
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 19, 2025 03:34:58Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, सटाणा ( नाशिक )*
image 2 vidoe 5
- ट्रक व स्कुटी अपघातात मुलीचा मृत्यू; भावास किरकोळ दुखापत
- नाशिकच्या सटाणा येथील घटना
Anc : सटाणा-मालेगाव रस्त्यावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सोमवारी सायंकाळी ट्रक आणि स्कुटी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात अजमीर सौंदाणे येथील मोक्षदा जगदीश बदान या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मोक्षदा ही आपल्या भावासह स्कुटीवरून जात असताना भरधाव ट्रकची धडक बसली. या धडकेत मोक्षदा ट्रकच्या चाकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा भाऊ कृष्णा याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून, त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातस्थळी पंचनामा केला आणि रस्त्यावर निर्माण झालेली वाहतूक कोंडी नियंत्रणात आणत मार्ग मोकळा केला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघातग्रस्त कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
0
Share
Report