Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

अंबरनाथमध्ये मनसे आणि ठाकरे गटाची ऐतिहासिक बैठक, ५ जुलैची तयारी!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 04, 2025 01:01:15
Ambernath, Maharashtra
अंबरनाथमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ५ जुलैच्या विजयी मेळाव्याचं बैठकीत नियोजन अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच मनसे आणि ठाकरे गट एकत्र Amb sena mns Anchor : अंबरनाथमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत ५ जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं. Vo : मनसेच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील उपजिल्हा शाखेत ही बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष शैलेश शिर्के, शहराध्यक्ष कुणाल भोईर, तसंच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख संतोष शिंदे, शहरप्रमुख अजित काळे यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ५ जुलैच्या विजयी मेळाव्याला अंबरनाथ शहरातून जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यांना घेऊन जाण्यासंबंधी नियोजन करण्यात आलं. ५ जुलैच्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असून त्यापूर्वीच अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र आल्याने दोन्ही पक्षात नवचैतन्य निर्माण झालं आहे. चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement