Back
सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर! ऑरेंज अलर्ट जारी!
Oros, Maharashtra
अँकर --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय मागील काही दिवस लपंडाव करणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपार पासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उद्या देखील जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील दोन दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलंय.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_aropi_arest
शहरात ऑटो रिक्षा चोरणाऱ्या संशयताला पोलिसांनी केली अटक
अँकर
नाशिक शहरातून ऑटो रिक्षा चोरणाऱ्या संशयताला गुन्हे शाखेच्या दोन पथकाने अटक केलीये... तुषार शेजवळ असं अटक केलेल्या संशयीता च नाव आहे... या संशयीताकडून त एक रिक्षा असा 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.... गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत...यामुळे पोलीस शितापीने कामाला लागले असून या संदर्भात गस्त घालत आहे... गोपनीय माहितीवरून शेजवळ हा रिक्षा चोरून पाथर्डी फाटा परिसरात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली... यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या संशयित आला अटक केली आहे.... या संशय त्याकडून अजून चोरीचे गुन्हे उघड येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय...
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0307ZT_WSM_WILD_ANIMALS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर :वाशिमच्या टो व पार्डी टकमोर या परिसरात वन्य प्राण्यांकडून नुकत्याच उगवून आलेल्या खारीपाच्या सोयाबीन,तूर, कपाशी, उडीत, मूग व ज्वारी या पिकाचं मोठया प्रमाणात नुकसान केलं जातंय त्यामुळं शेतकरी त्रस्त झालेत.या भागात नीलगाईचे मोठे कळप तयार झाले असून ते शेतात घुसून कोवळे पिकं फस्त करताहेत.वन विभागाने या वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनकडून केली जातं आहे.
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे करण्यात आले नामांतर
- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे करण्यात आले नामांतर
- आता श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती या नावाने होणार ओळख
- मार्केट कमिटीच्या या निर्णयाचे शेतकरी आणि व्यापारांकडून स्वागत
- 17 सप्टेंबर 2022 रोजी च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आला होता प्रस्ताव
- आता प्रशासकीय मान्यता मिळाल्याने करण्यात आले नामकरण
- गेल्या अनेक वर्षांपासूनची व्यापारी, आडते, शेतकऱ्यांची मागणी अखेर पूर्ण
0
Share
Report
Pune, Maharashtra:
पिंपरी चिंचवड महापालिकेची ऐतिहासिक कामगिरी, ९० दिवसांमध्ये केली ५२२ कोटींची कर वसुली
pimpri tax
kailas puri pune 3-6-25
feed by 2c
पहिल्या तिमाहीत ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी जमा केला कर....!
Anchor - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच अवघ्या ९० दिवसांमध्ये तब्बल ५२२ कोटी ७२ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या तिमाहीत कर वसुलीचा पाचशे कोटींचा आकडा पार करून ऐतिहासिक कामगिरी महापालिकेने केली आहे. पहिल्या तिमाहीत नागरिकांनी जास्तीतजास्त मालमत्ता कर भरावा, यासाठी कर संकलन विभागाने ३० जून २०२५ पर्यंत विविध सवलती जाहीर केल्या होत्या. या सवलतींना भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे शहरातील नागरिकांचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ९६६ कोटींची मालमत्ता कर वसुली केली होती. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये हा आकडा पार करण्यासाठी महापालिकेने सुरुवातीपासून नियोजन केले आहे. पहिल्या तिमाहीमध्येच जास्तीतजास्त कर वसूल व्हावा, यासाठी ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यासह विविध सवलती महापालिकेने जाहीर केल्या होत्या. या सवलतींना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत तब्बल ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे.
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_Dengue
शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ
अँकर -
पावसाळा सुरू होताच नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालीये. मागील आठवड्यात १६ रुग्ण आढळले, तर आतापर्यंत १३७ रुग्णांची नोंद झालेली आहे. आणि सध्या २५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत मोठी घट आहे. मागील वर्षी जूनमध्ये १६५ रुग्णांवर उपचार सुरू होते. महापालिकेच्या आरोग्य विभागानं विशेष उपाययोजना सुरू केल्या असून, झोपडपट्टी, नाले व जलसाठ्यांची तपासणी सुरू आहे. डेंग्यूचा प्रसार मुख्यतः Aedes नावाच्या मच्छरांमुळे होतो. हे मच्छर सकाळी आणि संध्याकाळी चावतात आणि घरातल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. डेंग्यूची मुख्य लक्षणं म्हणजे ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी, उलटी आणि त्वचेवर लाल चट्टे. लक्षणं दिसताच तातडीने डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलाय. तर महापालिकेने फॉगिंग, औषध फवारणी आणि जनजागृती मोहिमा सुरू केल्या आहेत. तरीसुद्धा नागरिकांनी घरात पाणी साचू देऊ नये, डेंग्यूचा ताप ओसरल्यावरही रक्तातील प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. त्यामुळे रक्ताच्या तपासण्या आवश्यक असल्याचेही पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी आवाहन केलंय.
बाईट- डॉ. विजय देवकर
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने हिच्या दोष निश्चितेसाठी 27 सप्टेंबरला होणार सुनावणी
- न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने हिच्या दोष निश्चितीसाठी 27 सप्टेंबरला होणार सुनावणी
- आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी संशयित आरोपी मनीषा माने हिने बुधवारी लावली होती न्यायालयात हजेरी
- मनीषा मानेची जामिनावर सुटका झाल्यापासून बुधवारी होती पहिली सुनावणी
- डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येस मनीषा माने हिला जबाबदार धरून चालविण्यात येणार खटला
- संशयित आरोपी मनीषा माने 66 दिवस कोठडीत राहिल्यानंतर 25 जून रोजी झाला होता जामीन
- त्यामुळे आता 27 सप्टेंबर च्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
0
Share
Report
Pune, Maharashtra:
Feed 2C
Slug: Wagholi Unit Six Action
File:01
Rep: Hemant Chapude(Wagholi)
Anc:दरोड्याच्या गुन्ह्यातील आठ महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात पुणे पोलिसांच्या युनिट सहा ला यश आले असून फिरोजंखा दुल्होत अलं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीने रात्रीच्या वेळी पेट्रोलियम करणाऱ्या पोलिस अंमलदारावरती दरोड्याच्या बहान्याने धारदार शस्त्राने हल्ला केला होता
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया वाघोली पुणे...
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn university av
Feed attached
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना संलग्नता शुल्कावर २०१७ पासून १८ टक्के जीएसटी आकरण्यात आला आहे. हा कर भरण्यासाठी जीएसटी विभागाने विद्यापीठाला नोटीस पाठविलेली आहे. त्यावर विद्यापीठाने तिसऱ्यांदा महाविद्यालयांच्या प्राचार्याना स्मरणपत्र काढून जीएसटी भरण्याचे आदेश दिले आहेत, तसेच जीएसटी न भरल्यामुळे आयकर विभागाकडून आकारण्यात येणारा दंडही संबंधित महाविद्यालयांनाच भरावा लागणार असल्याचेही विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने स्पष्ट
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0307_BHA_DHAN_KHAREDI
FILE - 5 VIDEO
उद्दिष्ट नसल्याने शेतकऱ्याची धान खरेदी रखडली..... सरकारने उद्दिष्ट न वाढविल्यास व्यापाऱ्यांना कमी दरात धान विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ.....
Anchor :- भंडारा जिल्ह्यात धान खरेदी रखडली असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात 5 लाख 75 हजार क्विंटल धान खरेदीची उद्दिष्ट मिळाल्याने आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी पूर्ण झाली आहे, पण भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना चांगला उत्पादन झाल्याने आणखी जवळ्पास 25 लाख क्विंटल धान खरेदी होण्याची शकतात आहे. सद्या उद्दिष्ट नसल्याने शेतकऱ्यांचे धान तसेच पडून आहे. त्यामुळे शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून द्यावे अशी मागणी होत आहे. अन्यथा कमी दरात व्यापाऱ्याला धान विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आता खरीप हंगामाची पेरणी सुरू असून शेतकरी लागवडी करीता पैसा आणायचा कुठून असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे पडला आहे.
BYTE : खेमराज गिरेपुंजे, शेतकरी
BYTE : पुरुषोत्तम हेमने, शेतकरी
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn airport av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर च्या चिकलठाणा विमानतळावर महिनाभरापूर्वी ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या ३ अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. आता या पाहणीच्या अहवालाची विमानतळ प्राधिकरणाला प्रतीक्षा असून, अहवालानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेची दिशा ठरणार आहे. गृहमंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्टलाही मंजुरी मिळण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातून किमान हिवाळ्यात तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. ब्यूरो ऑफ इमिग्रेशनच्या ३ अधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. या सुविधा आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या दृष्टीने योग्य आहेत की नाही, त्यात काही बदल करणे गरजेचे आहे का, या संदर्भात ब्यूरो ऑफ इमिग्रेशनकडून विमानतळाला अहवाल दिला जाईल. अद्यापपर्यंत हा अहवाल आलेला नाही, परंतु काही बदल करावे लागतील, अशी चिन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
0
Share
Report