Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411026

पिंपरी चिंचवड महापालिकेने 90 दिवसांत 522 कोटींची ऐतिहासिक कर वसुली केली!

KAILAS PURI
Jul 03, 2025 03:36:11
Pune, Maharashtra
पिंपरी चिंचवड महापालिकेची ऐतिहासिक कामगिरी, ९० दिवसांमध्ये केली ५२२ कोटींची कर वसुली pimpri tax kailas puri pune 3-6-25 feed by 2c पहिल्या तिमाहीत ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी जमा केला कर....! Anchor - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच अवघ्या ९० दिवसांमध्ये तब्बल ५२२ कोटी ७२ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या तिमाहीत कर वसुलीचा पाचशे कोटींचा आकडा पार करून ऐतिहासिक कामगिरी महापालिकेने केली आहे. पहिल्या तिमाहीत नागरिकांनी जास्तीतजास्त मालमत्ता कर भरावा, यासाठी कर संकलन विभागाने ३० जून २०२५ पर्यंत विविध सवलती जाहीर केल्या होत्या. या सवलतींना भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे शहरातील नागरिकांचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ९६६ कोटींची मालमत्ता कर वसुली केली होती. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये हा आकडा पार करण्यासाठी महापालिकेने सुरुवातीपासून नियोजन केले आहे. पहिल्या तिमाहीमध्येच जास्तीतजास्त कर वसूल व्हावा, यासाठी ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यासह विविध सवलती महापालिकेने जाहीर केल्या होत्या. या सवलतींना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत तब्बल ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement