Back
जालना में आषाढी एकादशी पर आनंदी स्वामींची भव्य पालखी मिरवणूक!
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0607ZT_JALNA_PALKHI(2 FILES)
जालना |आषाढी एकादशी निमित्त निघाली श्री आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक...
प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते जालन्याचे आनंदी स्वामी मंदिर...
जालना नगरीत उत्साहाचे वातावरण...
भज गोविंद भज गोपाल, स्वामी आनंदी दीनदयाळच्या जय घोषणाने दुमदुमला परिसर...
अँकर : जालन्यात आषाढी एकादशी निमित्त श्री आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक निघाली आहे. प्रति पंढरपूर म्हणून जालन्याचे आनंदी स्वामी मंदिर ओळखले जातं. मागील सुमारे 300 वर्षांपासून दर आषाढी एकादशीला जालन्यात आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक काढली जाते. आषाढी साठी जे भाविक पंढरपूर ला विठुरायाच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही. ते भाविक जालन्यात येऊन आनंदी स्वामींचे दर्शन घेतात. म्हणून जालन्याच्या आनंदी स्वामी मंदिराला प्रति पंढरपूर असे म्हटले जातं. आषाढी एकादशीच्या 7 दिवस आगोदर आनंदी स्वामी मंदिरात आषाढी सप्ताह आयोजित केला जातो. यावेळी आनंदी स्वामींनी 7 दिवस विविध देवी - देवतांचे रूप दिले जाते. त्यांनतर आषाढीच्या दिवशी जालन्यात आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक काढली जाते. यावेळी नगर प्रदक्षिणा करून रात्री उशिरा ही पालखी मंदिरात दाखल होते. दरम्यान, आजही आषाढी निमित्त जालन्यात आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक निघालीय. त्यामुळे जालना नगरीत उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. यावेळी भज गोविंद भज गोपाल, स्वामी आनंदी दीनदयाळच्या जय घोषणाने परिसर दुमदुमून गेला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement