Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

परळीतील माजी नगराध्यक्षाचे अघोरी कृत्य, जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल!

Mahendrakumar Mudholkar
Jul 06, 2025 10:07:57
Beed, Maharashtra
बीड: परळीत अजित पवार गटाच्या माजी नगराध्यक्षाकडून अघोरी कृत्य, जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल... PKG Anc- परळीत सप्तश्रृंगी देवीची मूर्तीस्थापना मिरवणुकीच्या दरम्यान अघोरी कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भर रस्त्यात कोंबड्याचा बळी देऊन नागलीची पाने, हळद - कुंकू आणि लिंबू टाकून रेषा ओढण्यात आले. हे अघोरी कृत्य दुसरे तिसरे कोणी नाही तर अजित पवार गटाचे परळी शहराचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केले आहे. या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होतोय. दरम्यान अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याप्रकरणी दीपक देशमुख यांच्यावर परळी शहरात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अघोरी कृत्यामुळे परळीत खळबळ माजली आहे. Vo 1 ------ डोक्यावर पाण्याचा कळस, गळ्यात कवड्याची माळ घालून परळीच्या भर वस्तीमधून सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेची मिरवणूक मोठ्या जल्लोषात सुरू होती. या मिरवणुकीत भाविकांची मोठी मांदियाळी होती. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक पुढे जात असतानाच काही अंतरावर अघोरी कृत्य करण्यात आले. रस्त्यावरच कोंबड्याचा बळी देण्यात आला. बाजूलाच नागलीचे पान, हळद - कुंकू, आणि लिंबू टाकून रेषा ओढण्यात आल्या. कोंबड्याचे रक्त देखील शिंपडण्यात आले. हा धक्कादायक आणि अघोरी कृत्य परळी शहरात करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे कृत्य करणारे महाशय परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. अघोरी कृत्याची वार्ता परळीतील सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचली. सामाजिक कार्यकर्त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. त्यानंतर दीपक देशमुख यांच्यावर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाईट: राणबा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, परळी Vo 2 ------ हातात लाल गंडा, अन् कानाला फोन लावून स्मितभाष्य करणारे जे आहेत परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक उर्फ नाना देशमुख... सप्तश्रृंगी देवीच्या मूर्ती स्थापना मिरवणुकी दरम्यान याच महाशयांनी अघोरी कृत्य केल्याचा आरोपी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. अघोरी कृत्य केल्याचा कोणताच पश्चाताप या महाशयांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार हे सुरू असल्याचे ते बिनदिक्कतपणे सांगत आहेत. एका कोंबड्याचा बळी दिल्यानंतर मी पुढाकार घेऊन बाकीचे कोंबडे जिवंत सोडण्यास सांगितल्याचा दावा दीपक देशमुख करत आहेत. बाईट: दीपक देशमुख, माजी नगराध्यक्ष परळी Vo3 ---- दीपक देशमुख हे अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत. तर आमदार धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत. देवीच्या मिरवणुकीदरम्यान त्यांनी केलेल्या अघोरी कृत्यामुळे समाजमनात संतापाची लाट उसळली आहे. देशमुख यांच्यावर परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. मात्र अघोरी प्रकार करणाऱ्या देशमुख यांच्यावर पक्षप्रमुख अजित पवार काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement