Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

उल्हासनगरच्या बिर्ला मंदिरात भक्तीचा महोत्सव: पहाटेची महापूजा!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 06, 2025 05:02:36
Ambernath, Maharashtra
प्रति पंढरीत भक्तीचा महोत्सव;  आषाढी एकादशीनिमित्त बिर्ला मंदिरात महापूजा Bdl shahad temple Anchor ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उल्हासनगर येथील बिर्ला मंदिर आज पहाटेपासून भक्तांच्या जयघोषाने गजरुन गेले होते. या पहाटे उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल-रुख्मिणीच्या महापूजा केली . पहाटे पाच वाजता अभिषेक, आणि त्यानंतर सहा वाजता आरती पार पडली. मंदिर परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात न्हाऊन निघाले .विठ्ठलनामाच्या जयघोषात, भक्तांनी आपल्या श्रद्धेचं दर्शन घडवत पुन्हा एकदा या मंदिराला पंढरीची अनुभूती दिली. बिर्ला मंदिरात आषाढी एकादशी एक भक्तिपूर्ण, मंगलमय वातावरणात साजरी झाली. चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement