Back
शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा, सातबारा कोरा झाला!
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- झी २४ तासच्या बातमीनंतर शेतकऱ्याला मोठा दिलासा... सहकारमंत्र्यांकडून केला सातबारा कोरा....तर बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही पवार कुटुंबीयांला दिली मदतीचा हात....
AC ::- अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांच्या मदतीसाठी आता अनेकांनी पुढाकार घेतला आहे. झी २४ तास ने हा मुद्दा सातत्याने आणि सर्वप्रथम पुढे आणल्यानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पवार यांच्या कर्जाचा भरणा केल्याचे पत्र पवार दांपत्याच्या हातात दिला आहे. तर बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही पवार कुटुंबीयांची भेट घेत मदतीचा हात दिला आहे. बैलजोडी घेण्यास पैसे नसल्याने अंबादास पवार यांनी स्वतःला औताला जुंपून शेतीची मशागत केल्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशनातही झी २४ तासच्या बातमीनंतर चर्चिला गेला होता. त्यावेळीच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी फोनवर संवाद साधून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. आता पाटील यांनी थेट पवार यांच्या घरी जाऊन चौकशी केली असून, संपूर्ण कर्जाची भरपाई करत सातबारा कोरा केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement