Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

किल्ले रायगडावर पावसाळ्यात स्वर्गीय सौंदर्याचा अनुभव घ्या!

PRAFULLA PAWAR
Jun 29, 2025 06:33:40
Raigad, Maharashtra
स्लग - किल्ले रायगडावर जणू स्वर्ग अवतरल्याचा भास ...... पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याने बहरली स्वराज्याची राजधानी..... अँकर - पाऊस म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते कोकण. हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या कोकणात कडीकपारीतील डोंगरात नभं उतरू आल्याने सौंदर्य अधिकच खुलले आहे स्वराज्याची राजधानी अशी जगभरात किर्ती असलेल्या किल्ले रायगडावर दाट धुक्याची चादर पसरल्याने जणू स्वर्गच धरतीवरती अवतरल्याचे मनमोहक दृष्‍य निर्माण झाले आहे त्यातच अधून मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी आणि थंडगार हवेची झुळूक अंगावर शहारे आणणारी आहे. राज्याच्या अनेक भागातील शिवप्रेमी, आणि पर्यटक हा अलौकिक सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आणि पावसाळ्यातील रायगड डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या संख्येने किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. बाईट - पर्यटक बाईट - पर्यटक बाईट - पर्यटक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement