Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

राज्यातील प्रत्येक मालमत्ता धारकाला मिळणार व्हर्टिकल सातबारा!

ANIRUDHA DAWALE
Jun 28, 2025 06:34:13
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_SAAT_BARA एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 राज्यातील प्रत्येक मालमत्ता धारकाला मिळणार व्हर्टिकल सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत, फ्लॅट धारकांना होणार फायदा अँकर :– आता राज्यातील प्रत्येक मालमत्ता धारकाला व्हर्टिकल सातबारा मिळणार असल्याच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले त्यामुळे प्रत्येक फ्लॅट धारकाला फायदा होणार असून सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. सध्या सरकार राज्यात महसूल विभाग कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार करत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घराचं स्वामित्व मिळालं पाहिजे, प्रत्येक धारकाला त्याचं प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे, यामध्ये त्याचा सातबारा व प्रॉपर्टी कार्ड असले पाहिजे या प्रॉपर्टी कार्ड मुळे लोकांना त्यांचा स्वामित्व देण्यात येईल. फ्लॅट धारकाचा सातबारा हा त्या मूळ मालकाचा राहत होता, आणि इमारती मधले फ्लॅट हे फ्लॅट धारकाचे राहत होते त्यामुळे शंभर टक्के व्हर्टीकल इमारती याला स्वामित्व देण्याची योजना महाराष्ट्र सरकार करत आहे असे बावनकुळे म्हणाले आहे. बाईट :– चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement