Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

पर्यावरणपूरक वृक्ष दिंडी: विद्यार्थ्यांनी जागवले झाडांचे महत्त्व!

GAJANAN DESHMUKH
Jul 06, 2025 09:30:34
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणीच्या मानवत तालुक्यातील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाने आषाढी एकादशी निमित्ताने वृक्ष दिंडी या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करीत विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे बीज पेरलंय. हे वृक्ष दिंडीचे तिसरे वृक्ष असून आहे. दिंडीमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषा साकारली होती,येथे विठ्ठल, रुक्मिणी साकारण्यात आले होते, टाळ, मृदंग अशा रंगीत थाटात विद्यार्थ्यांनी या वृक्ष दिंडीमध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी आपल्या डोक्यावर विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, औषधी रोपे घेऊन, हातामध्ये भगव्या पताका व “वृक्ष लावा, वृक्ष वाचवा”, “झाडे लावा, जीवन जगवा”, “पर्यावरण वाचवा” अशा संदेशाची फलक हाती घेत दिंडीत भाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण होऊन झाडांचे महत्त्व व त्यांचे जीवनातील योगदान समजावून यावे. सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांचे समन्वय या वृक्ष दिंडी मध्ये दिसून आले. बाईट- राजू वाघ- शिक्षक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement