Back
रायगड जिल्ह्यात महायुतीत वाद: निमंत्रण पत्रिकेवर धैर्यशील पाटील नाराज!
Raigad, Maharashtra
फीड मध्ये निमंत्रण पत्रिकेचे फोटो देखील आहेत.
स्लग - रायगड जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी ..... डायलिसिस सेंटरच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद ...... पत्रिकेत केवळ तटकरे कुटुंबीयांचीच नावे ..... भाजपचे खासदार धैर्यशील पाटील यांची नाराजी ..... घाईघाईने बदलण्यात आली पत्रिका ........
अँकर - रोह्यातील डायलिसिस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून आता महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी शेलक्या शब्दात नाराजी व्यक्त केलीय. या निमंत्रण पत्रिकेत केवळ मंत्री आदिती तटकरे , खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्याव्यतिरिक्त कुठल्याही लोकप्रतिनिधींचे नाव नव्हते. गेली अनेक वर्षे केवळ आपण आपण आणि आपणच असा प्रघात जो रोहा तालुक्यात सुरू आहे त्यात कुठं तरी बदल व्हायला हवा अशी अपेक्षा खासदार धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केली आहे. समाज माध्यमांवर पोस्ट करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. या नाराजीनंतर तातडीने नवीन पत्रिका काढण्यात आली. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केल्याने जिल्ह्यात महायुतीत आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
बाईट - धैर्यशील पाटील, राज्यसभा खासदार
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement