Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

लोणी प्रवरानगरमध्ये शालेय मुलांचा भक्तीमय मेळा, विखे पाटील सहभागी!

Kunal Jamdade
Jul 05, 2025 07:35:09
Shirdi, Maharashtra
Anc_ पंढरीत आषाढी एकादशीच्या दिवशी विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी वैष्णवांचा मेळा जमलेला असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी प्रवरानगर येथे शिक्षणाच्या पंढरीत शालेय मुलांचा मेळा जमलाय.. शेकडो शाळेतील दिंड्या लोणी गावात पोहचत असून आपली परंपरा आणी संस्कृती मुलांना माहीत व्हावी यासाठी हि संकल्पना राबवली जातेय.. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील सपत्नीक या वारीत सहभागी झाले आहेत.. वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची हे ब्रीदवाक्य घेऊन हजारो शालेय मुलं पारंपारीक वेशभुषेत दिंडीत सहभागी झाले आहेत.. टाळ मृदूंगाचा घोष, लेझीम खांद्यावर पालखी अशा भक्तीमय वातावरणाने लोणी गाव दुमदूमून गेलं आहे.. या दिंडीचा आढावा घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी.... Wkt कुणाल जमदाडे tiktak कुणाल जमदाडे with विखे पाटील
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement