Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

देहूगावचा ब्रिटिश कालीन पूल वाहतुकीस बंद, ग्रामस्थांची मागणी!

CHAITRALI RAJAPURKAR
Jun 27, 2025 03:34:55
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 2706ZT_MAVAL_DEHU_BRIDGE Total files : 03 Headline -देहूगाव येथील ब्रिटिश कालीन पूल वाहतुकीस बंद Anchor: संत तुकाराम महाराजांच्या देहूतील १५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ब्रिटिश कालीन पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. देहूनगर पंचायतीच्या वतीने या पुलाच्या दुतर्फा ,प्रवेश बंद असल्याचं सूचना फलक लावण्यात आले आहेत. मागच्या आठवड्यात कुंडमळा येथे लोखंडी पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली होती त्यात चार जणांचा निष्पाप बळी गेला , तर एकावन्न पर्यटक जखमी झाले होते. अश्या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, जुने मोडकळीस आलेले पूल वाहतुकीस बंद करावेत , असा आदेश राज्य सरकारने काढला होता. त्यानुषंगाने देहूनगर पंचायतीच्या वतीने देहूतील ब्रिटिश कालीन पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सध्या या पुलाची देखभाल पीडब्ल्यूडी करीत आहे. ब्रिटिश कालीन पूल पाडून टाकावा अशी मागणी देहूतील ग्रामस्थ करू लागले आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement