Back
दौंड अत्याचार प्रकरण: आरोपीचे स्केच पोलिसांकडून जाहीर!
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI
SLUG 0207ZT_DAUNDSKETH
FILE 5
दौंड अत्याचार प्रकरणातील आरोपीचे स्केच पोलिसांकडून प्रसिद्ध.... दोन दिवसांपूर्वी स्वामी चिंचोली हद्दीत अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार....दर्शनासाठी निघालेला प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटले दागिने
Anchor _ मागील दोन दिवसांपूर्वी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली च्या हद्दीत पहाटे सव्वा चार च्या सुमारास देवदर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांना चहासाठी थांबले असता दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून महिलांचे जवळपास दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे.याचवेळी तयातील एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार देखील केला.
अद्याप या प्रकरणातील आरोपी फरार असून दौंड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.या प्रकरणातील संशयित आरोपीचं स्केच दौंड पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सदर आरोपी बाबत कोणास काही माहिती मिळाल्यास दौंड पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे....
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Dhule, Maharashtra:
Anchor . धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. जुलै महिना उजाळला तरी जिल्ह्यात 33 टक्के पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. धुळे जिल्ह्यात खरिपाचे एकूण 3 लाख 78 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी दोन लाख 19 हजार हेक्टर वर कापूस पिकाची लागवडीचा लक्षांक आहे. मात्र जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे आत्तापर्यंत फक्त 40 टक्के पेरण्या झाल्या आहेत. यंदा चांगला पाऊस पडेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापसासह मका व बाजरीची पेरणी केली आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आठ ते दहा दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आहे ती पिक जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. पावसाचा खंड असाच राहिला तर दुबार पेरणीच संकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवेल.
byte - सिराज जगताप, कृषी अधीक्षक
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0307ZT_WSM_CAR_ACCIDENT
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम-रिसोड मार्गावरील वाशिमच्या शासकीय तंत्रनिकेतनजवळ काल रात्री एका चारचाकी वाहनाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. भरधाव गाडी रस्त्यालगत असलेल्या गड्ड्यात जाऊन आदळली. वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.गाडीत असलेले दोघे किरकोळ जखमी झाले.ही घटना शिकाऊ चालकामुळे घडली.वाहन शिकवत असलेल्या व्यक्तीने समोरून वाहन येताना हँडब्रेक खेचला; मात्र गोंधळलेल्या शिकाऊ चालकाने ब्रेकऐवजी चुकून एक्सिलेटर दाबल्याने गाडी गड्ड्यात जाऊन आदळली.या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्य व वर्दळीच्या रस्त्यांवर शिकाऊ चालकांकडून वाहन चालवण्याबाबत नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ शहर पोलिसांनी एमपीडीए कायदयाअंतर्गत सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे. शेख मोबीन ऊर्फ शेख मोईन ईसराईल असे त्याचे नाव आहे. २०२३ मध्ये एमपीडीए अंतर्गत त्याला स्थानबध्द करण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये ११ महीन्यानंतर हा कारागृहातुन बाहेर आला. त्याने हिंगणघाट आणि यवतमाळ शहर हददीत पुन्हा चोरीचे गुन्हे केल्याने त्याच्यावर पुनःश्च एम पी डी ए कायदया अंतर्गत कारवाई करण्यात आली.
0
Share
Report
Oros, Maharashtra:
अँकर ----सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला काल पासून सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदि नाल्यांना पूर कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीचे पाणी मार्गावर आल्याने वाहतूक ठप्प झाली असून जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क रहाव असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेय..
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- लग्नानंतर १० महिन्यांतच विवाहितेची आत्महत्या...निलंग्यातील कोराळवाडी येथील घटना... पती, सासू, सासऱ्याच्या त्रासाने विहिरीत उडी घेतल्याचा नातेवाईकांचा आरोप....
AC ::- १० महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या १९ वर्षीय नवविवाहितेने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरती मेकाले असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.पती आणि सासरच्या मंडळींनी चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला आणि आत्महत्येस प्रवृत्त केला असा आरोप नातेवाईकानी केला आहे.या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात कासारशिरसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर:-
नाशिकच्या निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथे नव्याने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र ला गळती लागली तसेच लाईट आणि पाण्याचा अभावामुळे दुरावस्था झाल्याने निफाड पंचायत समितीचे माजी सभापती पंडित आहेर आक्रमक झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आर बी महाजन आले असता संतप्त झालेल्या पंडित आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभियंताला कोंडून संताप व्यक्त केला जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नाही या ठिकाणी सुख सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले यावेळी कनिष्ठ अभियंता सांगतच राहिले की मी आपल्या साठी या ठिकाणी आलो आहे योग्य ती कारवाई करेल असे आश्वासन दिल्यानंतर तब्बल एक तासाने कुलूप उघडण्यात आले
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : यवतमाळच्या दत्त चौक ते वीर वामनराव चौक मार्गावर नालीचे सदोष बांधकाम केल्यामुळे पावसात रस्त्यावर जमा होणारे पाणी थेट दुकानांमध्ये शिरत आहे. जोराचा पाऊस झाल्यास रस्ते जलमय होऊन तेथील पाणी अनेक दुकानांमध्ये जात असल्याने येथील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. हा मार्ग तयार होत असतानाच स्थानिकांनी त्याच्या कामाबद्दल आक्षेप नोंदविले होते, मात्र नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप व्यवसायिकांनी केला आहे. परिणामी पावसाच्या पाण्यामुळे दुकानातील साहित्याचे नुकसान होत आहे.
बाईट : अनुप लिंगावार : व्यावसायिक
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
03072025
Slug - PPR_KUNKU_BUKKA
feed on 2c
file 02
--------
Anchor - आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणारे भाविक कुंकू आणि विठूरायाचा बुक्का आवर्जून खरेदी करतात. विशेषतः महिला भाविकांकडून वारी संपवून जाताना कुंकू, बुक्का, अष्टगंध आणि चंदनाला मोठी मागणी असते. हळदीपासून बनवलेल्या म्हणजेच पिंजर कुंकवालादेखील विशेष पसंती मिळते. भाविकांकडून मोठ्या प्रमाणात असलेल्या या मागणीमुळे पंढपुरात जवळपास 100 टन कुंकू विक्रीसाठी लागतं.
प्रत्येक वारकरी पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघताना विठूरायाचा कुंकू आणि बुक्क्याचा प्रसाद गावाकडे पाहुणे, मित्र आणि शेजाऱ्यांना आपुलकीनं देत असतो. आपल्या ज्या नातेवाईकांना वारीला येणं शक्य झालं नाही, त्यांना प्रसादाच्या रूपानं का होईना, विठूरायाचं दर्शन व्हावं, यासाठी पंढपुरातून कुंकू बुक्का सोबत नेला जातो.ही प्रथा वारकरी संप्रदायानं पिढ्यानपिढ्या जपली असल्यामुळे मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्ग परिसरात शेकडो कुंकू व्यापाऱ्यांची दुकानं पाहायला मिळतात. म्हणूनच आषाढी यात्रेत 'कुंकवाची बाजारपेठ' भरली असं म्हणतात.
सोबतच साखर फुटाणे,पेढा उदबत्ती अशा प्रासादिक वस्तूंच्या खरेदीला सुद्धा भाविक पसंती देतात
-------
Byte - राजेंद्र वट्टमवार, प्रासादिक वस्तू विक्री व्यापारी
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0307ZT_WSM_GARBAGE
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिम शहरात नगर परिषदेकडून नियमित घंटागाडी सेवा सुरू असून घरपोच कचरा संकलन केले जाते. तरीही काही नागरिक रस्त्याच्या कडेला किंवा नाल्यांत कचरा टाकतात, त्यामुळे परिसरात घाण साचते, दुर्गंधी पसरते आणि आरोग्याचा धोका निर्माण होतो.पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता वाढली आहे.प्रशासन स्वच्छतेसाठी प्रयत्नशील असले तरी नागरिकांचे अपुरे सहकार्य अडथळा ठरत आहे.त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_DARODA
सातारा:सातारा शहर आणि वाई परिसरात घरफोड्या करणार्या तिघांच्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोघांना अटक केलीय.संशयित चोरट्यांकडून पोलिसांनी घरफोडीतील चोरीचे 23 लाख रुपये किंमतीचे तब्बल 24 तोळे सोने जप्त केले आहे. यामधील मुख्य संशयित सूत्रधार लोकेश सुतार हा सांगली जिल्ह्यातील असून तो पसार झाला आहे.दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर आणि वाई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
0
Share
Report