icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लातूर के वडगाव में महावितरण के अधिकारियों के खिलाफ महिलाओं-ग्रामवासियों का प्रदर्शन

Latur, Maharashtra: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या वडगाव येथे महावितरणच्या कारभारा विरोधात नागरिकांचा संताप उफाळून आलाय. घरांमध्ये वीज मीटर बसविण्यात आलेले नसतानाही हजारो रुपयांची वीजबिले पाठविण्यात आल्याचा आरोप करत महिला आणि ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला. मीटरच नाही तर बिल कशाचे? असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. अनेक घरांना मीटर नसतानाही थकबाकी दाखवून अव्वाच्या सव्वा रकमेची बिले देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, ही बिले तातडीने रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे....
0
0
Report

सातारा में कास डहरण ऊँचाई बढ़ाने से जलवाहिनी पूरी, 24x7 पानी सप्लाई संभव

Satara, Maharashtra:सातारा शहराच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या कास धरण उंचीवाढ प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या जलवाहिनीच्या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. कास धरणातील पाणी शहरापर्यंत पोहोचविण्यासाठीची जलवाहिनी पूर्णत्वास आली असल्यामुळे येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पामुळे सातारा शहराला मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून भविष्यात २४x७ पाणीपुरवठा योजनेलाही चालना मिळणार आहे. यावेळी पॉवर हाऊस, सांबारवाडी आणि आनावळे येथील विविध कामांचाही आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
0
0
Report
Advertisement

शिरूर में सूखा: गर्मी ने जलस्रोत और चारे को किया प्रभावित; मानसून कब?

Shirur, Maharashtra:राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून महिना अर्धा संपत आला तरी पाऊस न बरसल्याने पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी उन्हाळ्यात तापमान ४५ अंशाच्या पार गेल्याने विहिरी, कूपनलिका आणि नद्यांचे जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. पाण्याअभावी हक्काचा चाराही करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुसरीकडे, प्रशासनाने धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. त्यामुळे आता मोठा पाऊस कधी पडतो आणि खरिपाच्या पेरण्या कधी सुरू होतात, याकडे संपूर्ण बळीराजाचे लक्ष लागले आहे.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report

एमआईएम को बढ़ा निधि, भाजपा नेता नाराज; महापौर ने बजट आंकड़े बदले

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या स्थायी समितीने हिंदुत्वाचा आक्रमक पवित्रा घेत एमआयएमच्या नगरसेवकांना अवघा ५ लाखांचा निधी दिला होता. भाजप नगरसेवकांना प्रत्येकी ५५ लाखांची खैरात वाटली होती. मात्र, अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देताना महापौर समीर राजूरकर यांनी सभापतींनी मांडलेली आकडेवारी पूर्णपणे बदलली. एमआयएमला वाढीव २० लाखांचा निधी दिला. यामुळे भाजप नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीकडून मनपाचा ३,३५४ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी एमआयएमच्या नगरसेवकांना ५ लाखांचा निधी दिला होता. हा निर्णय महापौरांनी बदलला आहे.. कुणी कोर्टात गेले तर फटका बसेल म्हणून महапौरांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जातेय..
0
0
Report

चंद्रपुर के भद्रावती में दो बच्चों की पानी के खड्ड में डूबकर मौत

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात दोन बालमित्रांचा पाण्याच्या खड्यात बुडून मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या पाचगाव येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत शौचासाठी गेलेल्या दोन बालमित्रांचा पाण्याच्या खड्यात बुडून मृत्यू झाला. मृत मुलांची नावे कार्तिक संदीप सावसाकडे (वय १२ वर्षे) आणि सानिध्य विजय दूधनकर (वय १० वर्षे) अशी आहेत. तर त्यांच्यासोबत असलेला आदित्य बालू राऊत (वय १२ वर्षे) हा मुलगा सुखरूप बचावला. काल दुपारच्या सुमारास तिघेही मित्र इरई धरण परिसरातील शेताजवळील पाण्याच्या खड्डाजवळ शौचासाठी गेले होते. यानंतर तिघांनी त्या खड्ड्यात पोहण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाण्यात उतरल्यानंतर कार्तिक आणि सानिध्य यांचा तोल जाऊन ते खोल पाण्यात अडकले. दोघेही बुडत असल्याचे लक्षात येताच आदित्यने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला ते शक्य न झाल्याने तो तातडीने गावाकडे धावत गेला आणि ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. काही वेळानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. भद्रावती पोलिस पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

रांजगांव में ट्रक पलटा, चार गाँव की बिजली गुल, महामार्ग पर सुरक्षा सवाल

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक के रांजगांव गणपति परिसर से एक बड़ी खबर सामने आ रही है। अश्टविनायक महामार्ग पर सीमेंट लेकर जा रहा एक ट्रक सड़क के किनारे 10 फुट गहरे गड्ढे में पलट गया। पाटस से भीमाशंकर की ओर सीमेंट ले जा रहे ट्रक के मोड़ पर अनुमान चुकने से यह दुर्घटना घटी। इस भीषण हादसे में ट्रक ने सड़क किनारे बिजली के खंभे उखाड़ दिए जिससे आसपास के चार गांवों की बिजली आपूर्ति बाधित हो गई है। महावितरण ने अब युद्धस्तर पर मरम्मत का काम शुरू कर दिया है। इस दुर्घटना में ट्रक चालक के पैर में गंभीर चोटें आईं, पर सौभाग्य से भारी जनहानि टली। हालांकि इस क्षेत्र में लगातार दूसरे दिन दुर्घटना होने से महामार्ग पर सुरक्षा का सवाल सामने आ गया है।
0
0
Report

अकोला में दो दिनों की बारिश से तापमान गिरा, ठंडी हवाओं ने लोगों को राहत दी

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अकोल्यात बुधवारी कमाल तापमान ३८.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. मात्र, काल पावसाच्या प्रभावामुळे तापमानात तब्बल ५.३ अंश सेल्सिअसची घट होऊन ते ३३.६ अंशांवर आले. तापमानातील या अचानक झालेल्या घसरणीमुळे वातावरण अधिक आल्हाददायक बनले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातच दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसही ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे तापमानात आणखी काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजी नगर में नलाकनेक्शन के लिए 72 प्लंबर नियुक्त, 4000 रुपये शुल्क

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात शहरातील सर्वच भागात नळाने पाणी देण्याचा महापालिकेचा आता प्रयत्न सुरू झालाय , शहराच्या नो नेटवर्क भागात महापालिकेने जलवाहिन्या टाकून ठेवल्या आहेत, नागरिकांना आता नवीन नळ कनेक्शन देण्यात येतील. यासाठी महापालिका प्रशासन एक धोरण निश्चित करीत आहे. शहरासाठी ७२ अधिकृत प्लंबरची नियुक्ती करण्यात येईल. नागरिकांना त्या प्लंबरकडूनच कनेक्शन घेता येईल. कनेक्शन घेण्यासाठी लागणारी मशीन महापालिका देणार आहे. एका नळ कनेक्शनसाठी १८०० रुपये व चालू आर्थिक वर्षाची पाणीपट्टी २ हजार असे मिळून ४ हजार रुपये घेण्यात येणार आहेत. कोणी अनधिकृत नळ घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर थेट फौजदारी कारवाई केली जाईल.
0
0
Report

छत्रपति संभाजी नगर में बारिश से जलजमाव, नगरपालिका ने आपदा नियंत्रण कक्ष सक्रिय कर दिया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली मात्र पहिल्याच पावसात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी साचून मनपाच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे मात्र यानंतर मनपा प्रशासन आता जागे झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाची तयारी आणि नियंत्रण कक्षाचा आढावा घेण्याचा फार्स प्रशासनाकडून सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या वातानुकूलित कार्यालयात बसून सीसीटीव्ही आणि चॅटबॉटच्या माध्यमातून शहरात कुठे पाणी साचले याचे नियंत्रण मनपाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका उंटावरून शेळ्या हाकणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे...
0
0
Report

केतन अगरवाल हत्या मामले में माफी साक्षी: नीरज कुमार का बयान

Varsoli, Maharashtra:लोहगड किल्ल्यावरील केतन अगरवाल प्रकरणात एक मोठी घडामोड घडलीये. ही घडामोड केतनच्या हत्येचा कट रचणाऱ्या सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरीच्या अडचणी वाढवणार आहेत. कारण पुणे ग्रामीण पोलिसांना एक माफीचा साक्षीदार मिळालाय. नीरज कुमार असं त्याचं नाव आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून माफीचा साक्षीदार म्हणून नीरजचा जबाब नोंदवला जातोय. आता हा नीरज कुमार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालाय. तर हा नीरज म्हणजे चेतनच्या दुकानातील कामगार आहे. केतनची हत्या करण्यासाठी लोहगडावर आलेल्या चेतनने या नीरजच्या फोनचा वापर केला होता, तर नीरज कडेचं चेतनचा फोन होता. हत्येच्या दिवशी म्हणजे 18 जूनच्या सकाळी सव्वा सात वाजल्यापासून ते सायंकाळच्या साडे पाच वाजेपर्यंत चेतनचा मोबाईल नीरजकडे होता. दिवसभर चेतनला जेवढे फोन आले ते सर्व नीरजने उचलले होते. या दरम्यान नीरजच्या फोनचे लोकेशन लोहगड आणि परिसरात ट्रेस झाले होते. त्यामुळं केतनच्या हत्या प्रकरणात नीरजची साक्ष महत्वाची ठरणार आहे. ज्यामुळं केतनच्या हत्येवळी चेतन लोहगडावर हजर होता. हे पोलिसांना न्यायालयात सिद्ध करता येणार आहे..
0
0
Report
Advertisement
0
0
Report

गोकुल दूध संघ चुनाव: हसन मुश्रीफ की गुट महायुति के सामने आज ताकत दिखाएगी

Kolhapur, Maharashtra:गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे प्रत्येक नेता शक्ती प्रदर्शन करत आपले ठराव दाखल करत आहे. आज गोकुळचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गट शक्ती प्रदर्शन करून ठराव दाखल करणार आहेत. यावेळी स्वतः मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांना महायुतीमध्ये एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला, पण हसन मुश्रीफ यांनी मात्र आपण महायुतीचे घटक असल्यामुळे महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार अशी भूमिका कायम ठेवली. त्यानंतर आज महायुतीमध्ये गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या निमित्ताने मुश्रीफ गटाची नेमकी ताकत किती मोठी आहे हे आज ठराव दाखल करून दाखविले जाणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top