Back
सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी!
Oros, Maharashtra
अँकर ----सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला काल पासून सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदि नाल्यांना पूर कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीचे पाणी मार्गावर आल्याने वाहतूक ठप्प झाली असून जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क रहाव असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेय..
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Ambernath, Maharashtra:
बदलापुरात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमावर गोळीबार
चार जणांनी गोळीबार केल्याची माहिती
बदलापूर पश्चिम पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात
Bdl firing
Anchor : बदलापुरात एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमावर चौघांनी गोळीबार केल्याची घटना घडलीये. बदलापूर गावातील आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
Vo : अल्ताफ शेख असं या गोळीबारात जखमी झालेल्या इसमाचं नाव असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अल्ताफ हा बदलापूर गावाकडून बोराड पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना तिथे आलेल्या चार इसमांनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात अल्ताफ हा जखमी झाल्याने त्याला बदलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत एका इसमाला ताब्यात घेतलं असून त्याच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
Byte : सचिन गोरे, पोलीस उपायुक्त
चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
अँकर -- काल बुधवारी वांद्रे पोलीस ठाणे हद्दीत समुद्राच्या पाण्यात बुडणाऱ्या महिलेस कर्तव्यावरील पोलीस अंमलदार यांनी जीवनदान दिले आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गॅलेक्सी अपार्टमेंट, येथे वॉचर म्हणून नेमणुकीस असलेले वांद्रे पोलीस ठाण्याचे कर्मचारी साईनाथ देवडे हे गॅलेक्सी अपार्टमेंट समोर असलेल्या प्रमोनेड परिसरात गस्त करीत असताना त्यांना समुद्राच्या पाण्यात एक महिला बुडताना दिसली त्यांनी त्वरित धावत जाऊन पाण्यात उडी मारून त्या महिलेस पाण्याबाहेर काढले. सदर महिला अर्धवट शुद्धीवर असल्याने तिला त्वरित वांद्रे येथील भाभा हॉस्पिटल येथे नेण्यात आले.तिला शुद्धीवर आल्यावर चौकशी केली असता महिलेचे नाव व्हेनेनटीया सरिता क्रासटा, वय 53 वर्ष, , वांद्रे पश्चिम येथील रहिवासी अलस्ताचे सांगितले.पोलिसाना मिळालेल्या माहितीनुसार ती मनोरुग्ण आहे व गेल्या 20 वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती बँडस्टँड परिसरात फिरत असताना कोणीतरी अदृश्य शक्ती तिचा पाठलाग करीत आहे असे तिला जाणवले व घाबरून तिने समुद्राच्या पाण्यात उडी मारली.
मनोज कुळकर्णी
Vdo attach २C
0
Share
Report
Pune, Maharashtra:
अहिल्यानगरच्या महात्मा फुले चौकात भीषण अपघात...
आयशर टेम्पो चालकाला फिट आल्याने, एक फोर व्हीलरसह आठ ते दहा मोटर सायकल चिरडल्या...
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली घटना...
अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद...
सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही...
अपघातात मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान...
बाईट:- प्रकाश भागानगरे, प्रत्यक्षदर्शी
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0307ZT_JALNA_FARMER_ANDO(5 FILES)
जालना | विहीरीत उड्या मारून जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन.
जालना - नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी...
अँकर | जालन्यात जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय.देवमूर्ती येथील विहीरीत उड्या मारून हे आंदोलन करण्यात आलं. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा मिळावा या मागणीसाठी मागील 62 दिवसांपासून जालन्याच्या देवमूर्ती येथे बाधित शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र, अजून पर्यंत शासनानं शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज देवमूर्ती येथे विहिरीत उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन केलय. राज्य सरकारने लवकरात लवकर जालना - नांदेड समृद्धी महामार्गात केलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याणमध्ये महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड
गरोदर महिलेल्या माराव्या लागतं आहे फेऱ्या...
घरावर झुकलेल्या झाडाची छाटणी साठी तात्पुरता वीज खंडित करण्याच्या मागणी साठी महिल्याच्या फेऱ्या..
पैशांची मागणी केल्याचा गरोदर महिलेचा आरोप..
Anchor :- ग्राहकांची अरेरावी करण्यासाठी कायमच चर्चात असलेले महावितरणचे कर्मचारी पुन्हा वादात सापडले आहेत.कल्याण पत्री पूल परिसरात एका गरोदर महिलेचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. या गरोदर महिलेच्या घरावर मागील काही दिवसांपासून एक मोठं झाड कोसळण्याच्या स्थितीत असून, ते हटवण्यासाठी तिच्या कुटुंबाने महावितरण कार्यालयाकडे वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती केली होती. मात्र, या कामासाठी महावितरण कर्मचाऱ्यांकडून पैसे मागण्यात आल्याचा आरोप केला आहे.
Vo..दरम्यान पीडित गरोदर महिलेने स्वतः व्हॉइस रेकॉर्डिंगद्वारे हे प्रकरण उजेडात आणले असून, तिच्या म्हणण्यानुसार, विज खंडित करून झाड हटवण्याच्या कामासाठी तिने एमएसईबी कर्मचाऱ्याला ५ हजार रुपये दिले. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी झाड कापण्यासाठी २५ हजार रुपये लागतील, अशी मागणी करत टाळाटाळ केली.
दरम्यान, ही बाब समजताच स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कल्याणमधील टाटा पॉवर कार्यालयात पोहोचले. घटनेची चौकशी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले, मात्र त्यांना कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ थांबवण्याची जबरदस्ती, तसेच "व्हिडिओ का काढताय , "पोलिसांना बोलावतो" अशा धमक्यांना दिल्या .या प्रकरणामुळे महावीतरण कर्मचारी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, एका गरोदर महिलेच्या सुरक्षिततेशी खेळ करून पैसे कमावण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.दोषी महावितरण अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन करून त्यांची चौकशी करण्याची केली मागणी
Byte :-रुक्सना अन्सारी ( गरोदर महिला)
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
03072025
Slug - PPR_DCM_BIKE
feed on 2c
file 03
-------
Anchor - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर मध्ये येऊन आषाढी वारी तयारीपूर्वक पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी शासकीय विश्राम गृह पासून 65 एकर पर्यंत बाईक वरून आमदार अवताडे यांच्यासोबत पाहणी केली. मात्र उप मुख्यमंत्री आणि आमदार तसेच त्यांच्या सोबतचे दुचाकीस्वार हेल्मेट घालायला मात्र विसरले, अती उत्साहपणा करण्याच्या प्रयत्नात कार्यकर्त्यांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचे दिसून आले.
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
शिर्डीच्या साई मंदिरात तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव...
9 ते 11 जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन...
तीन दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन...
गुरुपौर्णिमा उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डीत येणार... राज्यभरातून शेकडो पायी पालख्या लावणार गुरुपौर्णिमेनिमित्त साई दर्शनासाठी हजेरी...
*गुरु पौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साईसमाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार...*
साई संस्थानकडून उत्सवाची तयारी पूर्ण...
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती...
Byte - गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान शिर्डी
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
बदलापुरात आमदारांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर गोळीबार
दोन गटातल्या आपसातील वादातून गोळीबार
गोळीबारात एक जण गंभीर जखमी
Anchor - बदलापुरात आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोरील मुख्य रस्त्यावर गोळीबाराची घटना घडलीय. दोन गटातल्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतीय. या गोळीबारात अल्ताफ शेख हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. अल्ताफ शेख याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. दोन गटातील वादातूनच हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतीय. बदलापूर गावात आमदारांचा निवासस्थान आहे. त्यांच्या घरासमोरूनच बोराटपाडा मुरबाडकडे रस्ता जातो. याच रस्त्यावर हा गोळीबार झालाय.
चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या वसमत येथे माननिय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. या संशोधन केंद्रात निरोगी, सशक्त आणि गुणवत्तापूर्ण हळद रोपांची निर्मिती करण्यात आली होती. या हळद रोपांना शेतकरी वर्गात चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या टप्यात 1 लाख 5 हजार रोपांची शेतकऱ्यांनी उचल करीत त्यांच्या शेतामध्ये लागवड केली आहे.
यावर्षी 2 लाखांहून अधिक सेलम या मुख्य वाणासह फुले,स्वरूपा, पी डी के व्ही वायगाव, मेदुकर, एसबी १०८४३, रोमा, दुग्गीराला रेड, सुदर्शना या वाणांची रोपे तयार केली. या वाणांची निवड करताना अनुकूल वातावरण,किड व रोगांना कमी बळी पडणारे, वाढीचा कालावधी हा कमी, मध्यम व जास्त कालावधी, अधिक प्रमाणात कुरकुमीन असलेले, हळद पावडरसाठी उत्कृष्ट असलेले वाण निवड करून उपलब्ध करून दिले आहेत.
0
Share
Report
Pune, Maharashtra:
pimpri dog
kailas puri Pune 3-7-25
feed by 2c
Anchor - एका कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार रस्त्याच्या बाजूला बसलेल्या श्वानाच्या अंगावर घातली. श्वानावरून कार गेल्याने ते मोठमोठ्याने ओरडू लागले. त्यावेळी कार चालकाने पुन्हा कार अंगावर चालवून त्यास आणखी जखमी केले. ही घटना नवी सांगवी मध्ये सोमवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुणाल भारत कामत यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन ढावळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आरोपीने त्याची कार फुटपाथजवळ बसलेल्या एका श्वानावर मुद्दाम डाव्या बाजूची दोन चाके घातली. यामध्ये श्वान गंभीर जखमी झाला. श्वान जोरजोरात ओरडू लागला. असे असताना कार चालकाने पुन्हा कार रिव्हर्स घेत डाव्या बाजूच्या मागच्या चाकाने श्वानाला चिरडले. यामुळे श्वान गंभीर जखमी झाला आहे. प्राणी मित्रांनी श्वानाला रुग्णालयात दाखल केले आहे.
0
Share
Report