Back
नांदेडमध्ये बोगस पिकविमा अर्ज दाखल करणाऱ्या 40 CSC केंद्रांवर गुन्हा!
Nanded, Maharashtra
Satish Mohite
Slug - Ned_Insuarance
Feed on - 2C
--------------------------------
Anchor - शासकीय जमिनीवर आणि इतर शेतकऱ्यांच्या नावावर बोगस पिकविमा अर्ज दाखल करणाऱ्या 40 सामाईक सुविधा केंद्रावर (CSC सेंटर) नांदेडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सुविधा केंद्र चालकांनी नांदेड सह परभणी, लातूर, बीड, पुणे आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावावर आणि शासकीय जमिनीवर बोगस पिकविमा भरला होता. एकूण 4453 शेतकऱ्यांच्या नावावर अश्याप्रकारे बोगस पिकविमा भरण्यात आला होता.
वर्ष 2024 साठीचा हा पिकविमा होता. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला दाखल कागदपत्रावर संशय आला. त्यानंतर मार्च 2025 मध्ये जिल्हास्तरीय पिकविमा आढावा बैठकीत हा विषय मंडण्यात आला. त्यानंतर सुविधा केंद्र चालकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. 10 पेक्षा जास्त बोगस अर्ज भरणाऱ्या सुविधा केंद्र चालकांची सुनावणी घेण्यात आली. दोषी आढळलेल्या 40 सुविधा केंद्रावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार कृषी विभागाच्या तक्रारीवरून सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Byte - दत्तकुमार कळसाईत - जिल्हा कृषी अधीक्षक
Byte - सुशीलकुमार नायक - पोलीस उपधीक्षक नांदेड.
-------------------------
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement