Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

काँग्रेसचे भाऊ-बहीण एकत्र, चंद्रपूरमध्ये विरोधकांना धक्का!

ASHISH AMBADE
Jul 06, 2025 10:07:15
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0607ZT_CHP_CONG_UNITY ( single file sent on 2C)  टायटल:-- मुंबईत दोन भाऊ एकत्र आल्यानंतर चंद्रपुरात काँग्रेसचे भाऊ-बहीण आले सोबत, चंद्रपूरच्या मोहरम आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शनानिमित्त खा. प्रतिभा धानोरकर आणि  आ. विजय वडेट्टीवार फिरले एकत्र      अँकर:-- मराठीच्या मुद्यावर मुंबईत दोन दशकानंतर दोन भाऊ एकत्र आले. त्याचीच री ओढत चंद्रपुरात काँग्रेसचे दुरावलेले बहिण -भाऊ सोबत आल्याचे चित्र आज बघायला मिळाले. चंद्रपूरच्या खा. प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी शहरातील मोहरम आणि आषाढी एकादशी सणानिमित्त दर्शन घेण्यासाठी एकत्र दौरे केले. चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहातील गैबी शाह वली दर्ग्यावर त्यांनी चादर चढवित पुष्प अर्पण केले. जिल्हा बँक निवडणूक पाच दिवसांवर आली असताना या दोन नेत्यांनी जाहीरपणे एकत्र दौरे करण्याला पक्षांतर्गत एकतेचे संदर्भ आहेत. याशिवाय महापालिका निवडणुका पुढ्यात असताना वैयक्तिक तंबू बळकट करण्याचाही प्रयत्न मानला जात आहे. आम्ही दोघं एकत्र आलो तर काय होईल याची भीती विरोधकांना आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील सत्ताधारी भाजपचा एक वाघ पिंजऱ्यात असून दुसरा पिंजऱ्याजवळ जाऊन गुरगुरत असल्याची मिश्किल टिप्पणी वडेट्टीवार यांनी यावेळी केली. आम्ही या दर्शनाच्या निमित्ताने एकत्र आलो असून गैरसमज दूर झाल्याचे ते म्हणाले. चंद्रपूरच्या सत्ताधारी दोन भाजपच्या वारा नीही एकत्र येण्याचे प्रयत्न करून बघायला हवेत असा टोलाही त्यांनी लगावला.  बाईट १) आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement