Back
सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा करणे आता महाग पडणार!
VKVISHAL KAROLE
FollowJul 10, 2025 06:34:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn govt offices pkg
Feed by 2 c , फ़क्त कलेक्टर ऑफिस शॉट्स पाठवले आहे,बाकी थोडं जनरल वापरावे लागेल... ते पत्र सुद्धा जोडले आहे 2 सी ला
Anchor : शासकीय कार्यालयात गेलेला सामान्य नागरिक अनेक वेळ सरकारी अधिकारी व्यस्त असल्याने तिष्ठत बसतो, कधी कुणी वाढदिवस साजरा करत असतो कोणी फोनवर बोलत असतं तर कोणी मित्र आले म्हणून त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यामुळं सामान्य माणूस खोळंबतो, म्हणूनच आता राज्य सरकारने असल्या कामचुकरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे , कार्यालयीन वेळेत असे काही आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत...
Vo 1...
सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा करताय सावधान
काम सोडून फोनवर बोलताय तर कारवाई होणार
राज्य सरकारच्या पत्रानंतर जिल्ह्यधिकारी अकॅशन मोडवर
राज्य सरकारचे हेच ते पत्र ज्यामुळं सर्वच सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.. या पत्रात सांगितल्या प्रमाणे सरकारी कार्यालयात काम सोडून वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण, वैयक्तिक समारंभ करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळं सामान्य लोकांची काम होत नाही म्हणून इथून पुढं अस काही आढळल्यास नियंत्रण अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यास महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार कारवाई करण्यात येईल असं पत्रात म्हंटले आहे... फक्त वैयक्तिक समारंभ नाहीत तर कुणी काम सोडून फोन वर बोलत असेल तर त्यावर सुद्धा कारवाई होईल असे याबाबत संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले आहे...याबाबत तक्रार आल्यावर कारवाई करण्यासोबत त्या संबंधित कार्यालयाचे प्रमुख ही असल्या घटनांवर लक्ष ठेवून असणार आहे...
कशा कशावर असणार लक्ष
कार्यालयात वाढदिवस, अनिवर्सरी, कुठलाही वैयक्तिक कार्यक्रमांवर नजर असणार
सरकारी काम सोडून फोन वर अवांतर बोलत दिसल्यास कारवाई
सतत कार्यालयीन काम सोडून बाहेर जाणे, जागेवर न बसने यावर कारवाई होणार
कार्यालयीन वेळेत कार्यालयात मित्रांसोबत गप्पा मारण्याची सवय असणाऱ्यांवरही लक्ष असणार
कार्यालयीन वेळेत कार्यालयात गाणे म्हणणे...
सोबतच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सन्मान न दिल्यास नागरिकांचे प्रश्न समजून न घेतल्यास कारवाई
याबाबत तक्रारी आल्यास वा कार्यलयीन प्रमुखांच्या ही बाब लक्षात आल्यास कारवाई करण्या बाबत निर्णय घेण्यात आलाय...
Byte दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी
Vo 2... खरं तर या बाबत शासनाची नियमावली स्पष्ट आहे आणि कार्यालयीन कामाच्या वेळेत असला कामचुकारपणा केल्यावर शिक्षेची ही तरतुद आहे...
काय आहे शिक्षेच्या तरतूदी
किरकोळ शिक्षा
1.समज देणे
2..ठपका ठेवणे
3.. त्याची पदोन्नती रोखून ठेवणे
4.. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणाने अथवा त्याने आदेशाचा भंग केल्याने शासनाला आर्थिक नुकसान झाल्यास त्याच्या वेतनातून रक्कम वसूल करणे
5.. वेतनवाढ रोखून धरणे
6 वेतन श्रेणीत खालच्या टप्प्यावर आणणे
जबरी शिक्षा
निलंबन करणे, सक्तीची सेवानिवृत्ती , सेवेतून काढून टाकणे, सेवेतून बडतर्फ करणे..
नियम इतके स्पष्ट असल्यावरही कार्यालयात कामचुकार पण आढळून येतो त्यामुळं महसूल विभागाने नव्याने पत्र काढून आता कर्मचाऱ्यांना इशारा दिलाय... याबाबत कर्मचाऱ्यांना समुपदेशन ही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी सांगताय मात्र तरीही तक्रारी आल्यास शिस्तभंगाची कारवाई अटळ असल्याचे त्यांनी सांगितले...
Byte दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी संभाजी नगर
Vo 3.. नियम अनेक आहेत मात्र त्याचे पालन होत नाही किमान आताच्या नव्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर सरकारी कर्मचारी चोख काम करतील अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल हीच अपेक्षा आहे...
विशाल करोळे छत्रपती संभाजी नगर...
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement