Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411026

कार चालकाने श्वानावर केले 'हातोडा', प्राण्यांची मदत आवश्यक!

KAILAS PURI
Jul 03, 2025 12:35:12
Pune, Maharashtra
pimpri dog kailas puri Pune 3-7-25 feed by 2c Anchor - एका कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार रस्त्याच्या बाजूला बसलेल्या श्वानाच्या अंगावर घातली. श्वानावरून कार गेल्याने ते मोठमोठ्याने ओरडू लागले. त्यावेळी कार चालकाने पुन्हा कार अंगावर चालवून त्यास आणखी जखमी केले. ही घटना नवी सांगवी मध्ये सोमवारी सकाळी सव्‍वानऊ वाजताच्‍या सुमारास घडली. या प्रकरणी कुणाल भारत कामत यांनी सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन ढावळे याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आरोपीने त्याची कार फुटपाथजवळ बसलेल्या एका श्वानावर मुद्दाम डाव्या बाजूची दोन चाके घातली. यामध्ये श्वान गंभीर जखमी झाला. श्वान जोरजोरात ओरडू लागला. असे असताना कार चालकाने पुन्हा कार रिव्हर्स घेत डाव्या बाजूच्या मागच्या चाकाने श्वानाला चिरडले. यामुळे श्वान गंभीर जखमी झाला आहे. प्राणी मित्रांनी श्वानाला रुग्णालयात दाखल केले आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement