Back
कोकणातील बळीराजा: भात लावणीच्या कामात गुंतलेला!
Ratnagiri, Maharashtra
बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त
अँकर - कोकणात सध्या समाधानकारक पाऊस पडतोय त्यामुळं बळीराजा सध्या भात लावणीच्या कामात गुंतून गेलाय.शेतीत यांत्रिकीकरण झालं असंल तरी कोकणात अनेक ठिकाणी नांगरणीसाठी आजही बैलजोडीचा वापर केला जातोय.भलरी गात बळीराजा भात लावणी करतोय.भलरी हे पारंपारीक शेतक-याचं गाण आहे यातून एक वेगळा आनंद शोधण्याचा प्रयत्न बळीराजा करत असतो.काम करायला या गाण्यांमधून एक वेगळीच स्फुर्ती यांना मिळत असते.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_AGITATION
शक्तीपीठ महामार्ग विरोधात धाराशीमध्ये शेतकरी आक्रमक
धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको.
धाराशिव मध्ये आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर शेतकऱ्यांनी अडवला महामार्ग.
महामार्गाच्या दोन्ही बाजूनी अडवला शेतकऱ्यांनी रस्ता,
सरकार विरोधात शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी.
आंदोलन स्थळी पोलिसांचा कडेकर बंदोबस्त.
आंदोलन शेतकऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा.
आंदोलन स्थळी लागू आहे जमावबंदीचा कलम.
शक्तिपीठ महामार्ग चा विरोधात आंदोलनाचा शेतकऱ्यांनी दिला होता इशारा.
तासापासून सुरू आहे रस्ता रोको आंदोलन
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_KANDA_VAHTUK
सातारा - खटाव तालुक्यातील पुसेगाव-फलटण मार्गावरील वेटण ओढ्यावर पूल नसल्याने काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा ओढ्यात साचल्याने साठवलेला कांदा छाती इतक्या पाण्यातून बाहेर काढावा लागतो आहे. शेतकऱ्यांनी १४ मजुरांच्या मदतीने प्रति पिशवी ९० रुपये खर्च करून ४०० फूट अंतरावरून कांदा बाहेर काढला. मजुरांनी जीव धोक्यात घालून मदत केल्याचे समाधान असले तरी कांद्याला दर न मिळाल्याने नाराजी आहे.या भागात पाणी अडथळ्यामुळे यंत्र किंवा बैलांच्या मदतीने शेती करणे अशक्य असून, शेतकरी हातानेच पेरणी करत आहेत. त्यामुळे वेटण ओढ्यावर किमान साकव पूल तरी बांधावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शवला असून परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुरवाडी येथे शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेत जमिनीची मोजणी करण्यास विरोध दर्शवून परत पाठविलय. यावेळी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते,यात महिलांचा ही मोठा सहभाग होता...
बाईट- गोविंद घाटोळ - शेतकरी
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या बाबतीत बोलण्याची पात्रता अयोध्या पोळ यांची नाही, केवळ चर्चेत राहण्यासाठी त्या असे उद्योग करतात. राठोड यांचे कार्य मोठे आहे, देशात बंजारा समाजाचे नेतृत्व ते करतात. त्यामुळे समाज आणि शिवसैनिकांमध्ये पोळ यांच्या वक्तव्या मुळे संताप आहे. पोळ यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर देखील दिले जाईल त्याची जबाबदारी देखील पोळ यांच्यावरच असेल असा इशारा यवतमाळ शिवसेना जिल्हाप्रमुख राजूदास जाधव यांनी दिला आहे. अयोध्या पोळ वर कायदेशीर कारवाईबाबत देखील पावले उचलल्या जातील. संजय राठोड हे लोकप्रिय नेते असून त्यांच्या हितशत्रूंमध्ये पोटशुळ निर्माण होत असल्याने अशा महिलांद्वारे त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख राजुदास जाधव यांनी केला.
बाईट : राजुदास जाधव जिल्हाप्रमुख शिवसेना
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सरकारने गांधारीची भूमिका घेऊ नये,अन्यथा हातात बंदुका घेऊ - शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा सरकारला इशारा..
अँकर - शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत सरकारने गांधारीची भूमिका घेऊ नये,अन्यथा हातात बंदुका घ्याव्या लागतील,असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीच्या अंकली येथे सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं,यावेळी सांगली-कोल्हापूर मार्गावर महिलांसह शेतकऱ्यांनी ठिय्या मारला, ज्यामुळे रत्नागिरी-नागपूर आणि सांगली कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.भर पावसात शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले,या आंदोलनाला खासदार विशाल पाटलांनी देखील सहभाग नोंदवून पाठिंबा दिला,दरम्यान शक्तीपीठ महामार्ग हा सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असून सरकार जर गांधारीची भूमिका घेत असेल शेतकऱ्यांना हातात बंदुका घ्यावा लागतील याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी,असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
बाईट - महेश खराडे - जिल्हाध्यक्ष ,स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली
0
Share
Report
Buldhana, Maharashtra:
मोठी बातमी....
एसटी दुसऱ्या मार्गाने जात असल्याने , संतप्त पालकांनी बसेस अडवल्या.....
Anchor - जळगाव जामोद ते नांदुरा रस्त्यावरील येरळी गावाजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जुना पूल सोडून नवीन पुलावरून धावत असल्याने स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे मानेगाव आणि येरळी येथील विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शाळेतून येताना रात्री उशिरा त्यांना रस्त्यावरच सोडले जात असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर तोडगा न निघाल्याने संतप्त झालेल्या मानेगाव आणि येरळी येथील नागरिकांनी आज महामंडळाच्या सर्व बस थांबवून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांनी आपली मागणी लावून धरली असून, महामंडळाने जुन्या पुलावरून बससेवा पूर्ववत सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि स्थानिक रहिवाशांना होणारी गैरसोय दूर होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
Byte - अर्पिता साबे, विद्यार्थिनी
अभिजीत पाटील, नागरिक
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
6 FILES
SLUG NAME -SAT_DHOBALI_ISSUE
सातारा:औंध येथील शेतकऱ्यांनी शिमला मिरचीच्या बोगस रोपांमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे. याबाबत सातारा कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याने आणि नुकसान भरपाई न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी अधिकाऱ्यांना थेट घेराव घालून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.औंध येथील शेतकऱ्यांना सांगली येथील रोपवाटिकेने दिलेली ढोबळी मिरचीची रोपे बोगस निघाली त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालेच नाही असे असताना कृषी विभागाकडे अनेक वेळा तक्रार केल्यानंतर त्या रोपवाटिकेचा परवाना रद्द करण्यात आला मात्र झालेल्या नुकसानीची भरपाई मात्र कृषी विभाग देत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. कृषी विभागाने याविषयी ग्राहक मंचात दाद मागावी असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे... यावेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी आर्थिक मदत करण्याची कोणतीही तरतूद नसून ग्राहक मंचात दाद मागावी असा सल्ला दिल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बाईट:- जयवंत जगदाळे (नुकसान ग्रस्त शेतकरी)
बाईट - शेतकरी संघटना
बाईट: -महेश मोकळे ( कृषी उपअधीक्षक)
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
01072025
Slug - PPR_VINA_TABALA
feed on 2c
file 02
-----
Anchor - आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भजनी साहित्य विक्रीची दुकानं सजली आहेत. येथील विणे गल्लीतील दुकानांमध्ये भजनी साहित्य निर्मिती केली जाते.
वारकरी संप्रदायामध्ये वीणा,टाळ आणि पखवाज या वाद्यांना महत्वाचे स्थान आहे. किर्तन आणि भजनामध्ये तर विण्याचे स्थान आग्रभागी असते. वारी काळात वीणा वाद्याला मोठी मागणी असते. याशिवाय पखावाज आणि टाळांना ही मागणी असते. पंढरपुरात सर्व प्रकारचे भजनी साहित्याची निर्मिती व विक्री केली जाते. कच्च्या मालाचे व मजूरी दरात वाढ झाल्याने यंदा भजनी साहित्यामध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे रामेश्वर कोकाटे या विक्रेत्यांनी सांगितले.
--------
बाईट - रामेश्वर कोकाटे.भजनी साहित्य विक्रेते.
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज
स्किप्ट ::- शक्तीपीठ मोजणी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी.... मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारला जाब.... मोजणीसाठी अधिकारी येताच शेतकरी संतापले....
लातूर चे शेतकरी आक्रमक... लातूर जिल्ह्यातील तीन तालुके.... तेरा गावे.. 41 किलोमीटरचा रस्ता... यासाठी जमीन मोजणीला होतोय विरोध... मोठा पोलीस बंदोबस्त... अनेक गावातील शेतकरी एकवटले....
AC ::- सरकार महत्वकांक्षी उपक्रम म्हणून शक्तिपीठ महामार्गाकडे पहात आहे. मात्र यास अनेक ठिकाणी विरोध होत आहे.आज लातूर जिल्ह्यातील ढोकी आणि रुई रामेश्वर गावाच्या शिवारात मोजणी साठी महसूल विभागातील अधिकारी आणि काही कर्मचारी तसेच ज्या कंपनीस काम देण्यात आले आहे त्याचे कर्मचारी दाखल होत आहेत. मात्र ढोकी येथे आजुबाजूच्या काही गावातील शेतकरी त्या ठिकाणी येऊन आपला विरोध दर्शविला आहेत... या भागातील शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहे.. शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत...कोणत्याही यंत्रणेला गावात येऊ देणार नाही अशी भूमिका या भागातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.
बाईट ::- शेतकरी
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - ठाणे बेलापूर मार्गावर कंटेनरचा अपघात.
ठाणे बेलापूर मार्ग पर अपघात
ftp slug - thane belapur road accident
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor - ठाणे बेलापूर रस्त्यावर ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी सकाळी या मार्गावर झाली होती।
ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर घणसोली येथे हा अपघात झाला.
जिओ कंपनीजवळील उड्डाणंपुल चढत असताना कंटेनरचा झाला अपघात.
अपघातमुळे ठाणे बेलापूर मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाताना मोठी वाहतूक कोंडी.
जेसीबी च्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु.
रबाळे वाहतूक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय बेंडे घटनास्थळी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांसह वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम करत आहेत.
gf -
----------
0
Share
Report