Back
बच्चू कडूंचा शेतकऱ्यांना आवाहन: एकजूट करा, सरकारला हिसका दाखवा!
SRSHRIKANT RAUT
FollowJul 10, 2025 03:33:47
Yavatmal, Maharashtra
AVB
Anchor : यवतमाळ जिल्ह्यात दाखल झालेली बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा धो धो पावसामध्येही सुरू आहे. गाव खेड्यातील शेतकरी या यात्रेत सहभागी होत असून शेतकऱ्यांनो जाती धर्मात विभागू नका, लाठीकाठी, रुमणे घेऊन एकजूट करा आणि सरकारला हिसका दाखवा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे. हिंदी सक्तीचा जीआर मराठी भाषिकांचा मोर्चा निघण्याआधीच रद्द झाला मात्र रोज शेतकरी मरत असताना सरकार मात्र किंतु परंतु ची भाषा करीत आहे,
सरकारने शेतकऱ्यांचे उग्ररूप बघण्याआधीच कर्जमाफीचा निर्णय घेतल्यास, ही पदयात्रा मुख्यमंत्र्यांच्या घराकडे वळवून त्यांना खांद्यावर घेऊन नाचू असेही बच्चू कडू म्हणाले.
उपोषण, पदयात्रा झाल्यावरही सरकार कर्जमाफी देत नसेल तर गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू असाही ईशारा बच्चू कडू यांनी दिला.
बाईट : बच्चू कडू
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 10, 2025 13:34:53Parbhani, Maharashtra:
अँकर- गाय गोठा योजना आणि मागेल त्याला विहीर या योजनेतील सिंचन विहिरीचे 2021 पासून अनुदान मिळाले नसल्याने परभणी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे आज दिसून आले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सिकर यांच्या दालनात चार तासात ठिय्या आंदोलन केले,परभणी जिल्ह्यात विहिर न करताच हे अधिकारी विहिरीचे बिल अदा करीत असतांना ज्या शेतकऱ्यांनी खरोखर विहिरी तयार केल्या आहेत,त्यांना अद्याप पैसे का मिळत नाहीत असा सवाल उपस्थित करीत आजच विहिरीचे अनुदान द्या असा पवित्रा घेतला होता, शेतकरी आक्रमक झाल्याचे बघून अधिकाऱ्यांनी तासभरानंतर पोलीस कुमक मागवली,नानलपेठ पोलिसांनी एसआरपी प्लाटून बोलवल्या नंतर आंदोलनस्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आठ दिवसात अनुदान थकलेल्या आंदोलनकारी शेतकर्यांच्या अनुदानाचा प्रस्ताव नागपूरला पाठवू आणि 2020-21 मधील अनुदान शेतकऱ्यांना दोन तीन दिवसात अनुदान देणार असल्याचे लेखी आश्वासना शेतकऱ्यांनी तूर्तास आंदोलन स्थगित केले. त्यांनतर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेत नानलपेठ पोलीस ठाण्यात कारवाईसाठी नेले आहे,यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली...
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 13:34:45Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1007ZT_CHP_RATHYATRA
( single file sent on 2C)
टायटल :- चंद्रपुरात ४०० वर्षे जुन्या मंदिरात रथयात्रेच्या उत्साह , गुरुपौर्णिमेनिमित्त विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तींची रथयात्रा, विठ्ठलाचा रथ हाताने ओढण्याची परंपरा, हजारो चंद्रपूरकर झाले सहभागी, लाकडी रथाचे नगर भ्रमण
अँकर:- चंद्रपूरच्या प्राचीन विठ्ठल मंदिरातून आज गुरुपौर्णिमेनिमित्त विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तींची रथयात्रा काढण्यात आली. 400 वर्ष पुरातन असलेल्या या मंदिराला प्रति पंढरपूर मानलं जातं. दरवर्षी आषाढी एकादशी ला इथे विठ्ठलाची महापूजा होते आणि पौर्णिमेला लाकडाच्या रथातून विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तीला नगर भ्रमण करविल्या जातं. विशेष म्हणजे हा रथ हाताने ओढण्याची इथे परंपरा आहे. पंढरपूर येथे वारीला जाऊ न शकणारे भाविकांना इथे दर्शन केल्या मुळे पंढरपूर ला जाण्याचे पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे लोकं मोठ्या संख्येने या रथयात्रेला गर्दी करतात. दिंड्या-पताका, भजनी मंडळ, लेझीम पथकं यांच्या सुरेख संगमातून ही रथयात्रा 'जय हरि विठ्ठल' चा गजर करीत मंदिरात येते. हा सोहळा पाहण्यासाठी आज चंद्रपुरात हजारो भाविकांची गर्दी झाली होती.
बाईट १) ऍड.विजय मोगरे, विश्वस्त, विठ्ठल मंदिर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 10, 2025 13:31:42Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Shikh
Feed on - 2C
----------------------------
Anchor - गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट कलम 11 मधील संशोधन रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेड येथिल शीख बांधव मुंबईकडे रवाना झाले. उद्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर हे शीख बांधव धरणे आंदोलन सुरु करणार आहेत. नांदेड येथिल सचखंड गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट 1956 च्या कलम 11 मध्ये 2015 साली सरकारने संशोधन केले होते. या संशोधनानुसार बोर्डाचा अध्यक्ष निवडण्याचे अधिकार सरकारकडे घेण्यात आले होते. या निर्णयाला नांदेडच्या शीख बांधवाचा सुरुवातीपासून विरोध आहे. पूर्वीप्रमाणेच अध्यक्ष निवडीचे अधिकार सदस्यांकडे ठेवण्यात यावे अशी मगणी आहे. या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. आता याच मागणीसाठी उद्या 11 तारखेपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.
Byte - जरनेलसिंग गाडीवाले
------------------------
3
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 10, 2025 13:04:58Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरात मुसळधार पावसाला सुरुवात
- सोलापूर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात
- जवळपास एक महिन्याच्या विश्रांतीनंतर सोलापुरात पावसाची तुफान बॅटिंग
- सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पाऊस होत नसल्याने बळीराजा होता चिंतेत
- जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाची जोरदार हजेरी
- शहर जिल्हा परिसरात सुरु असलेल्या तुफान पावसाने बळीराजाला मोठा दिलासा
3
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 10, 2025 13:04:50Thane, Maharashtra:
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली घोषणा
सहा वर्षांनी होणार ठाणे वर्षा मॅरेथॉन
एकूण १० लाख ३८, ९०० रुपयांची पारितोषिके
प्रत्येक गटात प्रथम १० विजेत्यांना पारितोषिके व चषक
ठाणे महापालिका चषक ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार, १० ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात येत असल्याची घोषणा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी केली. ३०वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा २०१९मध्ये झाली होती. आता सहा वर्षांनी पुन्हा देशविदेशातील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर नागरिक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होऊ शकणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे..ठाणे महापालिका चषक ३१वी वर्षा मॅरेथॉन ही ठाण्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मॅरेथॉन आहे. सहा वर्षांच्या खंडानंतर ही मॅरेथॉन होत असल्याने सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून ही मॅरेथॉन यशस्वी करावी. गेल्या सहा वर्षात शहराच्या रचनेत, पायाभूत सुविधांमध्ये बदल झाला आहे. हे लक्षात घेऊन सर्व मॅरेथॉन मार्गांचे नियोजन करावे, असे आयुक्त राव यांनी नमूद केले. सर्व महापालिका अधिकाऱ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. तसेच, त्यासाठी आतापासूनच दररोज तयारीला लागावे, असेही आयुक्त राव म्हणाले.
1
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 10, 2025 12:43:34Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Bad_Roads
Feed on - 2C
----------------------------
Anchor - ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था का होते याची पोलखोल करणारे ग्रामस्थांचे व्हिडिओ सध्या नांदेड जिल्ह्यात व्हायरल होत आहेत. महिनाभरपूर्वी केलेले डांबर रस्ते चक्क हाताने उखरत आहेत. रस्त्यांच्या दर्जाहीन कामांकडे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.
Vo - नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हा डांबर रस्ता महिनाभरपूर्वीच करण्यात आलाय. दुगाव ते डोंगरगाव हा पाच किलोमीटरचा रस्ता दोन कोटी रुपये खर्चून करण्यात आलाय. पण गुत्तेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे दिसत आहे. ह्या रस्त्यात डांबराचा अत्यंत कमी वापर करण्यात आलाय. एका ग्रामस्थाने चक्क हाताने हा डांबर रस्ता उखरून या निकृष्ट रस्त्याची पोलखोल केली.
Sound Byte - श्रीपत पाटील - दुगाव. (व्हिडिओच्या सुरुवातीस दोगांव ते डोंगरगाव रस्ता असा उल्लेख रस्ता उखारनाऱ्याने केला आहे तो व्हिडिओ वापरावा)
Vo - लोहा तालुक्यातील हा दुसरा डांबर रस्ता पाहा. बाभुळगाव ते टाकळगाव ह्या दोन किलोमीटरच्या डांबर रस्त्याचे चार महिन्यापूर्वी पूर्ण झाले. पण ह्या रस्त्यातही डांबराचा अत्यंत कमी वापर करण्यात आला. हाताने हा रस्ता उखरून दाखवत गावातील युवकांनी या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पाडले.
Sound Byte - (व्हिडीओमध्ये दोन युवक रस्ता उखरत आहेत तो व्हिडिओ)
Vo - हे व्हिडिओ व्हायराल झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केल्यावर रस्ता हाताने उखरला जात असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी कॅमेऱ्यासमोर दुगाव ते डोंगरगाव रस्ता हाताने उखरून दाखवला. दर्जाहीन काम करणाऱ्या गुत्तेदारावर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
Byte - लक्ष्मण नागरे - दुगाव
Byte - मधुकर पुयड - दुगाव
Vo - पंतप्रधान सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते योजनेतून गावागावात रस्ते करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. अनेक वर्षानंतर गावांना जोडणारे रस्ते बनताहेत. मात्र गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जिपणामुळे निकृष्ट रस्ते बनत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारने यावर लक्ष ठेवण्यासाठी कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे.
---------------------------------
7
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 10, 2025 12:33:33Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : पैसे नाही म्हणता तर मागणी नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाला वीस हजार कोटी रुपये कसे दिले, जिथे कमिशन आहे तिथे आम्ही उभे, आणि जिथे कमिशन नाही तिथे आम्ही उभे राहत नाही हा सरकारचा हेतू स्पष्ट होतो असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात त्यांची सातबारा कोरा पदयात्रा सुरू असून मनसेने त्यांना पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज ठाकरे सोबत आल्याने कर्जमाफीला वेगळी दिशा मिळेल, सरकारला आता नमावं लागेल असे बच्चू कडू म्हणाले.
भाजीत खडा निघाला तर मारता, पण तुरीचे एक हजार रुपये कमी झाले तर कमसे कम नाही बंदूक तर दंडा तरी हातात घ्यायला पाहिजे असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला.
बाईट : बच्चू कडू
1
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 12:32:42Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1007ZT_CHP_TRAFFIC_CLOSE
( single file sent on 2C)
टायटल:--- वर्धा नदीला पूर, चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा-भोयेगाव-गडचांदूर मार्ग बंद, मालवाहू वाहतूक ठप्प
अँकर:---- चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. नदीचं पाणी पुलावरून जात असल्यामुळे आज सकाळपासून धानोरा-भोयेगाव-गडचांदूर मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना धानोरा आणि भोयेगाव मार्गावर शेकडो मालवाहू ट्रकची रांग लागली असून वाहनचालकांना तासनतास प्रतिक्षा करावी लागत आहे. दरम्यान, नदीच्या पुरामुळे आसपासच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 10, 2025 12:32:17Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळे राष्ट्रीय महामार्गाचीअत्यंत दुरावस्था झाली आहे. तळोदा अक्कलकुवा या दोन तालुक्यातून गुजरातला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत. वाहन चालक, स्थानिक नागरिक, स्थानिक नेते यांनी वारंवार सांगूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. नेत्रंग शेवाळे महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होतं आहेत. महामार्गावर असलेल्या अनेक फुलांचे संरक्षण कठळे तुटल्याने जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास करीत आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आता थेट भाजप नेत्यांचे पत्र देत दम भरला आहे. महामार्गावरील खड्डे लवकरच दुरुस्त ने केल्यास यां विरोधात आंदोलनचा इशारा भाजप नेते नागेश पाळवीं यांनी दिला आहे.
BYTE :- नागेश पाडवी, भाजप नेते अक्कलकुवा
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
2
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 10, 2025 12:32:07Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात मनसेचे आंदोलन..
मुख्यालयाच्या गेटमध्ये नारळ फोडून केले आंदोलन..
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण मध्ये एका तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला . महापालिकेच्या आरोग्य विभागा कडून डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर कोणताही उपाय योजना केल्या जात नसल्याचा आरोप करत मनसेने आज महापालिका मुख्यालयात प्रतीकात्मक आंदोलन केलं. यावेळी मनसैनिकांनी इडा पिडा टळो अशी आरोळी देत नारळ फोडत महापालिकेचा निषेध नोंदवला
2
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 10, 2025 12:09:18Yeola, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या येवला तालुक्यातील कोळगाव येथे सेमी इंग्रजी असलेल्या जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या पुरेशी असताना देखील शाळेला अतिरिक्त शिक्षक नसल्याने पालकांनी शाळेला टाळे ठोकल्याची बातमी झी 24 तास ने दाखवली होती या बातमीने खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने कोळगाव जिल्हा परिषद शाळेला त्वरित शिक्षक उपलब्ध करून दिल्याने येथील पालकांनी झी 24 तास चे आभार मानले आहे.
12
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 10, 2025 12:08:56Kalyan, Maharashtra:
कल्याण मध्ये डेंग्यूचा बळी..
31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Anchor :- कल्याण मध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे . डेंग्यूची लागण झालेल्या 31 वर्षे तरुणाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे विलास म्हात्रे असे या तरुणाचे नाव असून तो कल्याण पश्चिमेकडील बेतुरकर पाडा परिसरात राहत होता .
Vo... पावसाळ्यात कल्याण डोंबिवली मध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. मलेरिया डेंगू या आजाराने कल्याण डोंबिवलीत डोकं वर काढलंय . मे पासून आतापर्यंत डेंग्यूचे सुमारे 30 रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेत . कल्याण पश्चिम बेतूरकर पाडा येथे राहणाऱ्या विलास म्हात्रे या 31 वर्ष तरुणाला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले होते .सात जुलै रोजी विलासला कल्याणमधील केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .मात्र प्रकृती खालावल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात नेण्याच्या सूचना केडीएमसी रुग्णालयाकडून करण्यात आला होत्या. मात्र विलास याच्या कुटुंबीयांनी त्याला कल्याण पूर्वेकडेल एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने आज विलास म्हात्रे याचा मृत्यू झाला .
Byte :- हर्षल गायकवाड ( अतिरिक्त आयुक्त केडीएमसी )
13
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 10, 2025 12:06:15Pandharpur, Maharashtra:
10072025
Slug - PPR_MLA_GRAPELOSS
feed on 2c
file 01
-----
Anchor - सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागांच्या नुकसानीवरून माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सभागृहात आज रुद्रावतार धारण केला. जिल्ह्यातील माढा पंढरपूर येथील 20,000 हेक्टर वरील द्राक्ष बागांच नुकसान झालेला असताना सरकारने फक्त 33 हेक्टर वरील द्राक्ष बागांना नुकसान भरपाई दिली आहे. सभागृहात प्रश्न मांडू दिला जात नसताना त्यांनी आक्रमक होत मतदारसंघातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला.
12
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 10, 2025 12:05:59Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे शहरात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरातील ६५ मराठी शाळांपैकी तब्बल ४५ शाळा बंद असून, उर्वरित सुरु असलेल्या २० शाळांपैकी १३ उर्दू माध्यमाच्या तर फक्त ७ शाळा मराठी माध्यमाच्या शाळा अस्तित्वात आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी यासाठी महापालिकेच्या वतीने शिक्षण मंडळाच्या शाळा सुरु करण्यात येतात. मात्र धुळ्यातील मराठी शाळांचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.शहरात महापालिकेच्या ६५ शाळा होत्या मात्र त्यातील ४५ शाळा बंद अवस्थेत आहेत.विशेष म्हणजे सुरु असलेल्या २० शाळांपैकी १३ शाळा या उर्दू माध्यमाच्या असून फक्त ७ शाळा मराठी माध्यमांच्या सुरु आहेत. राज्यात मराठी हिंदी भाषेचा वादंग सुरु असतांनाच धुळे शहरात महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या तब्बल ४५ शाळा बंद पडल्या आहेत.सुरु असलेल्या २० शाळांपैकी देखील काही शाळांचे बांधकाम जुनं असल्याने शाळांची दुरवस्था झाली आहे.२० शाळांपैकी काही शाळांमध्ये पावसात गळत असलेल्या वर्गखोलींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे. एकेकाळी धुळ्यात खाजगी शाळांपेक्षा जास्त पटसंख्या या महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळेत असायचे. मात्र आता परिस्थिती अवघड झाली आहे.धुळे शहरात खाजगी शाळांचा सुळसुळाट वाढला आहे.एकीकडे महापालिकेच्या गुणवत्ता आणि सोयी सुविधा बघता पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत शिकवण्याची पसंती दर्शविली आहे.गुणवत्ता नसल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत घट निर्माण होत आहे. मराठी शाळांची तब्बल ४५ शाळा बंद असतांनाच या बाबत कुठल्याच लोकप्रतिनिधींना काही एक देनघेन नाही.मराठी भाषे संदर्भात राज्यात देखील वाद होत असले तरी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सुरु असलेल्या मराठी शाळेची ही अवस्था म्हणजे दुर्देव म्हणाले लागेल.
Byte - व्हि एल दसरवाड,शिक्षण मंडळाधिकारी, महापालिका
प्रशांत परदेशी, धुळे.
13
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 10, 2025 12:05:02Dhule, Maharashtra:
Anchor धुळे तालुका पोलिसांनी कारवाई करत दरोड्याच्या गुन्ह्यातील सुमारे 42 लाखांची रोकड जप्त केली असून चौघांना अटक केली आहे. लखनऊ इथून एका ऍग्रो कंपनीची सुमारे दीड कोटी रुपयांची रोकड घेऊन कंपनीचे लोक स्कॉर्पिओने मुंबईला जात होते. यादरम्यान धुळे जिल्ह्यातील पुरमेपाडा गावाजवळ चौघांनी गाडीला रोखत बंदुकीचा धाक दाखवून दीड कोटी रुपयांची रोकड लुटून नेली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान धुळे तालुका पोलिसांनी तपास चक्र फिरवत सुरत इथून चौघांना अटक केली आहे. रोकड घेऊन जात असलेल्या कारच्या चालकानेच इतर साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याचे पोलीस तपासात समोर आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह सहभागी असलेल्या चौघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 42 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
Byte- धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक धुळे तालुका
प्रशांत परदेशी, धुळे.
11
Share
Report