Back
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू काढत आहेत 138 किलोमीटरची पदयात्रा!
Yavatmal, Maharashtra
AVB
Anchor : राज्यात धार्मिक जातीय मुद्दे पुढे करून शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना बदल देण्यात येत आहे, राज आणि उद्धव ठाकरे मराठी हिंदू म्हणून एकत्र येत असतील, मराठा ओबीसी म्हणून कोणी एकत्र येत असेल तर शेतकरी शेतमजूर म्हणून देखील एकत्र यायला पाहिजे. अशी भूमिका प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मांडली आहे. बच्चू कडू उद्यापासून १४ जुलै पर्यंत सातबारा कोरा पदयात्रा काढत आहे, अमरावतीच्या पापळ ते यवतमाळच्या चिलगव्हाणपर्यंत 138 किलोमीटर ही पदयात्रा असणार आहे. या यात्रेत शेतकरी शेतमजूर जर एकवटले तर सत्तेतल्या माणसांना सुसू येईल, त्यांना पॅन्ट सोडण्याची देखील फुरसत मिळणार नाही असा इशारा कडू यांनी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील ही यात्रा राजकीय नाही, यात पक्षीय झेंडा नाही.
असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साडे तीन लाख शेतकरी महिलांचे सिंदूर पुसल्या गेले. सद्यस्थितीत सहा आठ महिन्यापासून मजुरांची मजुरी मिळाली नाही.
काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचे महत्व कुणालाही नाही. देशात शेती विकली पाहिजे असे षडयंत्र आहे. शेती व्यापार झाला पाहिजे त्यातून शोषण झाले पाहिजे अशा षडयंत्रातून
शेतीचे व्यापारीकरण करण्याचा आणि त्यातून कारखानदारी चालवण्याचा डाव असल्याचा आरोप कडू यांनी केला.
बाईट : बच्चू कडू
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement