Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये आषाढी एकादशी: भक्तांची मोठी गर्दी विठ्ठल मंदिरांमध्ये!

GANESH MOHALE
Jul 06, 2025 10:30:49
Washim, Maharashtra
वाशिम: File:0607ZT_WSM_ASHADHI_PROGRAM रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर :आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाशिम जिल्ह्यातील विविध भागांतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच अनेक ठिकाणी टाळ-मृदुंगाच्या गजरात,भक्तिरसात न्हालेल्या वारकऱ्यांनी मंदिर परिसर गजबजून गेला होता.वाशिम शहरातील विठ्ठल मंदिर, तसेच रिसोड, मालेगाव, कारंजा, मनोरा या ठिकाणच्या मंदिरांमध्ये देखील भक्तांची मांदियाळी जमली होती.काही ठिकाणी हरिपाठ, कीर्तन,नामस्मरणासह फराळाचे कार्यक्रम आयोजिले गेले होते.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement