Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये शेतकऱ्यांचा जीव वाचवणारी अद्भुत रेस्क्यू मोहीम!

GANESH MOHALE
Jun 27, 2025 03:00:46
Washim, Maharashtra
वाशिम : File:2706ZT_WSM_FARMER_RESCUE रिपोर्टर :गणेश मोहळे,वाशिम  अँकर :वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पेडगाव येथे पैनगंगा नदीला आलेल्या अचानक पुरात अडकलेले दोन शेतकरी अखेर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अक्षय अंभोरे आणि मदन मोरे अशी शेतकऱ्यांची नावे आहेत.हे दोघे शेतकरी शेतात गेले असताना मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पैनगंगा नदीला मोठा पूर आला.जीव वाचवण्यासाठी दोघे शेतकरी शेतातील एका झाडावर चढले आणि ते दुपारपासून तेथे अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर घटनास्थळी दाखल झाल्या. संत गाडगेबाबा रेस्क्यू टीम, पिंजर यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. बोटीद्वारे बचाव मोहीम राबवून दोन्ही शेतकऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. बाईट: वैशाली देवकर उपविभागीय अधिकारी वाशिम  बाईट रामेश्वर चव्हाण पोलीस निरीक्षक रिसोड 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement