Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

अकोला मंदिराला 'ब' वर्ग दर्जा: श्रेयवादाची लढाई सुरू!

JAYESH JAGAD
Jun 28, 2025 06:30:49
Akola, Maharashtra
8 फाईल्स आहेत..PKG Anchor : अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्रीराज राजेश्वर मंदिराला 'ब' वर्ग दर्जा देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी नगर विकास विभागाच्या बैठकीत घेण्यात आलाय..मात्र या नंतर अकोल्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालीय.. Vo 1 : विकासात्मक कामांसाठी नेहमीच श्रेय घेण्यासाठी नेते मंडळी पुढाकार घेतात मात्र जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल मागे टाकतात..अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्रीराज राजेश्वर मंदिराला ' ब ' वर्गचा तीर्थक्षेत्र दर्जा घोषित करण्यात आला आणि यानंतर जिल्ह्यात रंगला श्रेयवाद...श्रीराज राजेश्वर संस्थानला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्रदान करण्याचा मार्ग प्रशस्त झालाय...श्री राजेश्वर मंदिराला 'ब' वर्ग दर्जा द्यावा अशी मागणी करणारे पत्र भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी 22 जुलै 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते..यानंतर आपण वारंवार ही मागणी रेटून धरली असल्याचं भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी म्हंटलं आहेय..तर नुकत्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्या दरम्यान त्यांनी ही मागणी पुन्हा जाहीररिते केली होती..आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला होता, तीर्थक्षेत्राचे निकष ठरवण्यासाठी समितीची बैठक मंत्रालयात झाली आणि श्रीराज राजेश्वर संस्थांना 'ब' वर्ग देण्याबाबतचा निर्णय बैठकीत निश्चित करण्यात आला..मात्र ज्याचं या विषयाशी कोणतही संबंध नाही अशा लोकांनी श्रेय घेऊ नये असा टोला भाजपने काँग्रेसला लगावलाय.. Byte : रणधीर सावरकर , भाजपा आमदार.. Vo 2 : श्री राज राजेश्वर मंदिराला ' ब ' वर्गाचा तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असल्याची माहिती मिळाली आणि काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातील माहिती दिलीय..मंदिराला ' ब ' वर्गाचा दर्जा मिळावा म्हणून आपण गतवर्षी सत्तास्थापनेनंतर पहिल्याच हिवाळी अधिवेशनात राजेश्वर मंदिराला 'ब' दर्जा मिळावा करिता आपल्या पहिल्याच अधिवेशनात ही मागणी केली होती तर 15 दिवसांआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही हा मुद्दा आपण पुन्हा उपस्थित केला होता म्हणत पठाण यांनी भाजपला टोला लगावलाय..भाजपला राहुल गांधी मंदिरात जातात या पासून त्रास होतो त्याच प्रमाणे साजिद खान पठाण मंदिरात जातो त्यांना ते ही आवडत नसल्याचा आरोप पठाण यांनी केलाय..मात्र आपण कोणताही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नसून ज्यांनी ज्यांनी मंदिराला ' ब ' वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले त्यांचे ही त्यांनी आभार मानले.. Byte : साजिद खान पठाण, काँग्रेस आमदार.. Final : प्रस्ताव नगर विकास विभागाला सादर झाल्यानंतर शासन निर्णय जाहीर होण्यासह अन्य प्रक्रिया होईल..'ब' दर्जाचा आदेश पारीत झाल्यानंतर मंदिर व परिसराच्या पुनर्विकासासाठी २५० कोटी रुपये मंजूर ही होतील..मात्र श्रेय वादाच्या या फेरीत जिल्ह्यात विकासात्मक काम होत असल्याचा आनंद सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेय.. जयेश जगड, झी मीडिया, अकोला
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement