Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar411030

राहुरीमध्ये बनावट नोटांचा मोठा रॅकेट उघडकीस!

LAILESH BARGAJE
Jun 29, 2025 16:00:34
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- डुप्लिकेट चलनी नोटा फीड 2C अँकर:- अहिल्यानगरच्या राहुरी येथे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे मशीन आणि इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन दोन इसम नगरच्या दिशेने येत असताना सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी तिन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 75 बंडल असा 37 लाख 50 हजार रुपये तर दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटा एकूण 44 बंडल ज्याची किंमत 8 लाख 80 हजार रुपये इतकी आहे या सर्व नोटाचा प्रकरण झाले आहे. तर नोटा बनवण्याचे साहित्य 18 लाख रुपये असे एकूण तब्बल 70 लाख 73 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करत आहे. बाईट:- सोमनाथ गर्गे, पोलिस अधीक्षक अहिल्यानगर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement