Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

कर्जमाफी निवारण योजना: किसानों से आवश्यक कागदपत्र जमा कराने का अभियान तेज

SRSHRIKANT RAUT
Feb 10, 2026 10:05:38
Yavatmal, Maharashtra
नापिकी व विविध संकटांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण योजनेकरिता माहिती संकलनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर दिले होते, त्या दृष्टीने शासनाने पावले टाकले असून, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रक्रियेला वेग आला आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे. राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने प्रस्तावित शेतकरी कर्ज निवारण योजनेसंदर्भात माहिती संकलनाचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील विविध सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली आवश्यक कागदपत्रे बँकेकडे जमा केलेली नाहीत, त्यांनी आपले आधार कार्ड, फार्मर आयडी व इतर आवश्यक माहिती सचिव किंवा वसुली अधिकाऱ्यांकडे द्यायवी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हान यांनी केले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Feb 10, 2026 12:49:22
Satara, Maharashtra:सातारा - शंभूराज देसाई यांनी पाटण पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आणि जिल्हा परिषदेच्या सात पैकी सहा जागांवर विजय मिळवल्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय रॅली काढण्यात आलेली होती. यावेळी शंभूराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती. यादरमयन शंभूराजे देसाईन वरती प्रचारादरम्यान मंत्री गणेश नाईक आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली होती या टिकेला प्रतिउत्तर शंभूराजे देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. टांगा पलटी घोडे फरार अशा प्रकारचे पोस्टल लावून त्यावरती जयकुमार गोरे आणि गणेश नाईक यांचे फोटो लावण्यात आले होते.या विजय रॅलीमध्ये शंभूराज देसाईंच्या कार्यकर्त्यांनी मंत्री जयकुमार गोरे आणि गणेश नाईक यांना पोस्टरमधून चांगलच डिवचले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 10, 2026 12:32:32
Chandrapur, Maharashtra:निकालानंतर एकाही काँग्रेस नेत्याने एम आय एम शी सहकार्यासाठी संपर्क साधला नाही, انهنक आमची गरज नसेल तर आम्हालाही त्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया चंद्रपूर मनपा महापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या एमआयएमच्या अजहर शेख यांनी दिली आहे. या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकार केवळ एका मताने महापौरपदी विजयी झाल्या आहेत हे विशेष. आम्ही मात्र अनेकदा त्यांना संपर्क केला. मात्र त्यांनी प्रत्येक वेळेस गरज नसल्याचे सांगितले. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत जनविकास सेनेचे पप्पू देशमुख हा अन्यायाविरोधात लढणारा चंद्रपुरातील चेहरा आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मतदान केले असेही शेख म्हणाले. निकालानंतर एकाही काँग्रेस नेत्याने आमच्याशी संपर्क केला नाही हे त्यांनी ठासून सांगितले.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 10, 2026 12:22:36
Wardha, Maharashtra:वर्ध्यात यंदा कापसाची आवक घटली; शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट अँकर - यंदाच्या खरीप हंगामात कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून बाजारात येणाऱ्या कापसाच्या आवकेतही लक्षणीय घट दिसून येत आहे.वर्धा तालुक्यात 2024-25 या हंगामात जिल्ह्यात सुमारे १ लाख ११ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. मात्र 2025-26 या चालू हंगामात आतापर्यंत केवळ ४५ हजार क्विंटल कापसाचीच आवक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह कापूस प्रक्रिया उद्योगालाही याचा फटका बसत आहे. कापसाचा CCI दर ८,०१० रुपये असून खाजगी खरेदी केंद्रांवर ७,९०० रुपये दराने कापूस खरेदी होत आहे. मात्र नवीन CCI नोंदणी प्रक्रिया बंद असल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत CCI मार्फत कापूस खरेदी सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कापसाच्या उत्पादनातील घट ही मुख्यत्वे बियाण्यांच्या गुणवत्तेमुळे झाली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त बियाणे उपलब्ध असून त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. अनेक शेतकरी आंध्रप्रदेशातील बियाणे खरेदीसाठी जात असल्याचे त्यांनी नमूद केले.यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने कापसाला मोठा फटका बसला. कापसाचे बोंड नीट फुटले नाहीत. सोयाबीनचेही पीक हातच गेले. सध्या येणारा कापूस हा हलका वेचाचा असून त्याचे वजन कमी निघत आहे. बियाणे, लागवड व मशागतीचा खर्च वाढला असताना कापसाला अपेक्षित १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने कापूस बियाण्यांवर संशोधन करण्याची गरज असल्याची मागणीही त्यांनी केली. बाईट- विलास चंदनखेडे, शेतकरी, गोजी कापसाला जास्त पाण्याची गरज नसते. एक-दोन पाण्यातही कापसाचे चांगले उत्पादन घेता येते. मात्र यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने कापसाच्या पहिल्या पिकाला मोठा फटका बसला. पहिला वजनी कापूस न आल्यामुळे बाजारात हलका कापूस आला, परिणामी वजन घटले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. कापूस बियाण्यांवर सखोल संशोधन होणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. बाईट - पियुष ठक्कर, जिनिंग मालक,वायगाव फायनल विवो - एकूणच कापसाच्या उत्पादनातील घट, अपेक्षित दरांचा अभाव, बियाण्यांची गुणवत्ता आणि हवामानातील बदल यामुळे यंदाचा कापूस हंगाम शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे.
0
comment0
Report
Feb 10, 2026 12:19:19
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ : शहरातील वडगाव रोड परिसरातील सहकारनगर, महादेवनगर व राणाप्रताप नगर येथे मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज दोन ते तीन जणांना कुत्रे चावत असल्याच्या घटना घडत असून अबालवृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज गुलशन प्रोव्हिजन दुकानाजवळ आणि नगराध्यक्ष प्रियदर्शिनी उईके यांच्या निवासस्थानाच्या परिसरात निवृत्त शिक्षिका अंजली चौधरी यांच्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी यवतमाळ नगरपालिकेकडे केली आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 10, 2026 11:08:34
Junnar, Pune, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले शिवनेरी गडावर फिरायला आलेल्या एका तरुणाचा मृतदेह अंबरखानाच्या पाठीमागील खोल दरीत आढळून आलाय. किल्ले शिवनेरी गडाच्या सनसेट पॉईंटजवळील कड्यावरून सुमारे ७०० फूट खोल दरीत हा मृतदेह आढळला असून, मृत तरुणाची ओळख शिरूर येथील रहिवासी मंगेश सोनवणे अशी झाली आहे. मंगेश हा एमपीएससी परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती समोर आली असून, त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर जुन्नर वनविभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त पथकाने रेस्क्यू मोहिम राबवून मृतदेह बाहेर काढला असून, शवविच्छेदनासाठी तो जुन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 10, 2026 10:47:42
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 10, 2026 09:09:33
Kolhapur, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर आज अचानक भलं मोठं झाड कोसळले आहे. या अपघातात एक गार्ड जखमी झाला आहे. शंभर वर्षांपूर्वीचे रेन ट्री नावाचे हे झाड आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी रहदारी कमी होती, तरीदेखील दोन दुचाकी गाडीवर हे झाड कोसळले. यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची संरक्षक भिंत देखील काही प्रमाणात ढासळली. सध्या कोल्हापूर महानगरपालिका फायर ब्रिगेडचे कर्मचारी हे झाड हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 10, 2026 08:51:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका नूतन महापौर और उपमहापार्षांच्या निवडी पडल्या पार... सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाची आणि राष्ट्रवादी आघाडीचे सत्ता स्थापन झाली. महापौर आणि उपमहापौर निवडणुक प्रक्रिया पार पडली असून बिनविरोध झालेल्या निवडी मध्ये भाजपाचे धीरज सूर्यवंशी यांची महापौर व उपमहापौर पदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गजानन मगदूम यांची निवड झाली आहे. महापालिकेच्या सभागृहामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया पार पडली. निवडीनंतर माजी खासदार संजयकाका पाटील व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या उपस्थिती नुतून महापौर,उपमहापौरांनी पदभार स्वीकारल. या निवडीनंतर सांगली शहराच्या विकासाला प्राधान्य देणार,असल्याचा विश्वास नुतून महापौर धीरज सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 10, 2026 08:33:37
Navi Mumbai, Maharashtra:आज पनवेल महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीत भाजप महायुतीचे नितीन जयराम पाटील यांची बिनविरोध महापौर म्हणून निवडण्यात आली ,तसेच उपमहापौर पदी भाजप महायुतीच्या प्रमिला रविनाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली ,निवडणूक महाविकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवार अर्चना भोईर आणि उपमहोर पदाचे उमेदवारी लीला कातकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली अडीच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड झाली असून, पाणी, रस्ते आणि आरोग्य या विषयांना प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांनी सांगितले। तर म्हापलीक पनवेल तालुका जिल्हा परिषद मद्ये भाजपला मिळलेले यश हे कार्यकर्त्यांचे असल्याचे मत यावेळी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 10, 2026 07:51:50
Kalyan, Maharashtra:मालमत्ता कर थकबाकीदारांना KDMC चा कडक इशारा. थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा मालमत्ता जप्ती अटळ मालमत्ता कर वसुलीसाठी कर्मचार्यांची फौज तैनात कल्याण डोंबिवली महापालिकेचं मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत्र असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे मालमत्ता कराचे उद्दिष्ट 500 कोटी होते त्यामधील जवळपास 300 कोटी वसुली जानेवारीपर्यंत झाली आहे उर्वरित दोन महिन्यांमध्ये 200 कोटी वसूल करण्याचा चंग कल्याण डोंबिवली महापालिकेने बांधला असून 31 मार्चपूर्वी मालमत्ता कराची थकीत वसुली करण्यासाठी केडीएमसीने विविध उपाय योजना सुरू केल्यात. मालमत्ता कर थकबाकीदारांना केडीएमसीने थेट नोटिसा पाठवत थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा मालमत्ता सील किंवा जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील दिलाय .काही दिवसांपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे त्याचप्रमाणे महिनाभरात थकीत रकमेची वसुली करण्यासाठी केडीएमसीने कर्मचारी अधिकाऱ्यांची फौज देखील तैनात केले आहे याबाबत अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी मालमत्ताकर थकबाकी दराने थकीत रकमेचा भरणा करावा आणि जप्तीची कारवाई टाळावी अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येईल असा इशारा दिला है
0
comment0
Report
Advertisement
Back to top