Back
वर्धा में कपास उत्पादन और दरों में भारी गिरावट, किसान संकट
MAMILIND ANDE
Feb 10, 2026 12:22:36
Wardha, Maharashtra
वर्ध्यात यंदा कापसाची आवक घटली; शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट
अँकर - यंदाच्या खरीप हंगामात कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून बाजारात येणाऱ्या कापसाच्या आवकेतही लक्षणीय घट दिसून येत आहे.वर्धा तालुक्यात 2024-25 या हंगामात जिल्ह्यात सुमारे १ लाख ११ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. मात्र 2025-26 या चालू हंगामात आतापर्यंत केवळ ४५ हजार क्विंटल कापसाचीच आवक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह कापूस प्रक्रिया उद्योगालाही याचा फटका बसत आहे.
कापसाचा CCI दर ८,०१० रुपये असून खाजगी खरेदी केंद्रांवर ७,९०० रुपये दराने कापूस खरेदी होत आहे. मात्र नवीन CCI नोंदणी प्रक्रिया बंद असल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत CCI मार्फत कापूस खरेदी सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कापसाच्या उत्पादनातील घट ही मुख्यत्वे बियाण्यांच्या गुणवत्तेमुळे झाली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त बियाणे उपलब्ध असून त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. अनेक शेतकरी आंध्रप्रदेशातील बियाणे खरेदीसाठी जात असल्याचे त्यांनी नमूद केले.यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने कापसाला मोठा फटका बसला. कापसाचे बोंड नीट फुटले नाहीत. सोयाबीनचेही पीक हातच गेले. सध्या येणारा कापूस हा हलका वेचाचा असून त्याचे वजन कमी निघत आहे. बियाणे, लागवड व मशागतीचा खर्च वाढला असताना कापसाला अपेक्षित १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने कापूस बियाण्यांवर संशोधन करण्याची गरज असल्याची मागणीही त्यांनी केली.
बाईट- विलास चंदनखेडे, शेतकरी, गोजी
कापसाला जास्त पाण्याची गरज नसते. एक-दोन पाण्यातही कापसाचे चांगले उत्पादन घेता येते. मात्र यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने कापसाच्या पहिल्या पिकाला मोठा फटका बसला.
पहिला वजनी कापूस न आल्यामुळे बाजारात हलका कापूस आला, परिणामी वजन घटले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. कापूस बियाण्यांवर सखोल संशोधन होणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
बाईट - पियुष ठक्कर, जिनिंग मालक,वायगाव
फायनल विवो - एकूणच कापसाच्या उत्पादनातील घट, अपेक्षित दरांचा अभाव, बियाण्यांची गुणवत्ता आणि हवामानातील बदल यामुळे यंदाचा कापूस हंगाम शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UJUmesh Jadhav
FollowFeb 10, 2026 13:41:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 10, 2026 13:40:240
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 12:49:220
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 12:32:530
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 10, 2026 12:32:320
Report
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:20:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:08:340
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 10, 2026 10:47:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 10, 2026 10:05:380
Report
PNPratap Naik1
FollowFeb 10, 2026 09:09:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 10, 2026 08:51:430
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 10, 2026 08:49:57Navi Mumbai, Maharashtra:बारावी च्या परीक्षेला सुरवात
navi mumbai
0
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 10, 2026 08:33:370
Report