Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

शिरपूर में अज्ञात मृत व्यक्ति: हत्या की आशंका, पुलिस जांच शुरू

GMGANESH MOHALE
Feb 10, 2026 08:33:06
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मालेगाव–रिसोड मार्गवर किन्ही घोडमोड नजीक अडोळ नदीच्या काठावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार मृतकाची हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मृतकाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, या प्रकरणी शिरपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Feb 10, 2026 11:08:34
Junnar, Pune, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले शिवनेरी गडावर फिरायला आलेल्या एका तरुणाचा मृतदेह अंबरखानाच्या पाठीमागील खोल दरीत आढळून आलाय. किल्ले शिवनेरी गडाच्या सनसेट पॉईंटजवळील कड्यावरून सुमारे ७०० फूट खोल दरीत हा मृतदेह आढळला असून, मृत तरुणाची ओळख शिरूर येथील रहिवासी मंगेश सोनवणे अशी झाली आहे. मंगेश हा एमपीएससी परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती समोर आली असून, त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर जुन्नर वनविभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त पथकाने रेस्क्यू मोहिम राबवून मृतदेह बाहेर काढला असून, शवविच्छेदनासाठी तो जुन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 10, 2026 10:47:42
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 10, 2026 10:05:38
Yavatmal, Maharashtra:नापिकी व विविध संकटांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण योजनेकरिता माहिती संकलनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर दिले होते, त्या दृष्टीने शासनाने पावले टाकले असून, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रक्रियेला वेग आला आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे. राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने प्रस्तावित शेतकरी कर्ज निवारण योजनेसंदर्भात माहिती संकलनाचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील विविध सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली आवश्यक कागदपत्रे बँकेकडे जमा केलेली नाहीत, त्यांनी आपले आधार कार्ड, फार्मर आयडी व इतर आवश्यक माहिती सचिव किंवा वसुली अधिकाऱ्यांकडे द्यायवी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हान यांनी केले आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 10, 2026 09:09:33
Kolhapur, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर आज अचानक भलं मोठं झाड कोसळले आहे. या अपघातात एक गार्ड जखमी झाला आहे. शंभर वर्षांपूर्वीचे रेन ट्री नावाचे हे झाड आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी रहदारी कमी होती, तरीदेखील दोन दुचाकी गाडीवर हे झाड कोसळले. यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची संरक्षक भिंत देखील काही प्रमाणात ढासळली. सध्या कोल्हापूर महानगरपालिका फायर ब्रिगेडचे कर्मचारी हे झाड हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 10, 2026 08:51:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका नूतन महापौर और उपमहापार्षांच्या निवडी पडल्या पार... सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाची आणि राष्ट्रवादी आघाडीचे सत्ता स्थापन झाली. महापौर आणि उपमहापौर निवडणुक प्रक्रिया पार पडली असून बिनविरोध झालेल्या निवडी मध्ये भाजपाचे धीरज सूर्यवंशी यांची महापौर व उपमहापौर पदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गजानन मगदूम यांची निवड झाली आहे. महापालिकेच्या सभागृहामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया पार पडली. निवडीनंतर माजी खासदार संजयकाका पाटील व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या उपस्थिती नुतून महापौर,उपमहापौरांनी पदभार स्वीकारल. या निवडीनंतर सांगली शहराच्या विकासाला प्राधान्य देणार,असल्याचा विश्वास नुतून महापौर धीरज सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 10, 2026 08:33:37
Navi Mumbai, Maharashtra:आज पनवेल महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीत भाजप महायुतीचे नितीन जयराम पाटील यांची बिनविरोध महापौर म्हणून निवडण्यात आली ,तसेच उपमहापौर पदी भाजप महायुतीच्या प्रमिला रविनाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली ,निवडणूक महाविकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवार अर्चना भोईर आणि उपमहोर पदाचे उमेदवारी लीला कातकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली अडीच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड झाली असून, पाणी, रस्ते आणि आरोग्य या विषयांना प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांनी सांगितले। तर म्हापलीक पनवेल तालुका जिल्हा परिषद मद्ये भाजपला मिळलेले यश हे कार्यकर्त्यांचे असल्याचे मत यावेळी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 10, 2026 07:51:50
Kalyan, Maharashtra:मालमत्ता कर थकबाकीदारांना KDMC चा कडक इशारा. थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा मालमत्ता जप्ती अटळ मालमत्ता कर वसुलीसाठी कर्मचार्यांची फौज तैनात कल्याण डोंबिवली महापालिकेचं मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत्र असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे मालमत्ता कराचे उद्दिष्ट 500 कोटी होते त्यामधील जवळपास 300 कोटी वसुली जानेवारीपर्यंत झाली आहे उर्वरित दोन महिन्यांमध्ये 200 कोटी वसूल करण्याचा चंग कल्याण डोंबिवली महापालिकेने बांधला असून 31 मार्चपूर्वी मालमत्ता कराची थकीत वसुली करण्यासाठी केडीएमसीने विविध उपाय योजना सुरू केल्यात. मालमत्ता कर थकबाकीदारांना केडीएमसीने थेट नोटिसा पाठवत थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा मालमत्ता सील किंवा जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील दिलाय .काही दिवसांपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे त्याचप्रमाणे महिनाभरात थकीत रकमेची वसुली करण्यासाठी केडीएमसीने कर्मचारी अधिकाऱ्यांची फौज देखील तैनात केले आहे याबाबत अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी मालमत्ताकर थकबाकी दराने थकीत रकमेचा भरणा करावा आणि जप्तीची कारवाई टाळावी अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येईल असा इशारा दिला है
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 10, 2026 07:51:17
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 10, 2026 07:33:36
Satara, Maharashtra:सातारा - जनतेने निवडणूक हातात घेतल्या मुळे दैदिप्यमान यश पाटण मध्ये मिळाले आहे. बलाढ्य धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी ही निवडणूक जिंकली आहे. जिल्ह्यात त्रिशंकू निकाल लागला असल्याने शिवसेनेची भूमिका ही महत्वाची असली तरी अद्याप मी कोणाशीही या बाबत चर्चा केलेली नाही. भाजपने देसाई यांची कोंडी करत भाजपच्या बड्या नेत्यांनी पाटण मध्ये येऊन देसाई यांचा टांगा पलटी करू, पालकमंत्री नमले, विशेष पॅकेज देण्याची भाषा केली त्याचा काहीही परिणाम झाला नाही. देसाई कुटुंबावर प्रेम करणारी ही जनता आहे. ही जनता आमचे कुटुंब आहे त्यामुळे आमच्या पाटण मतदारसंघातील जनता अशा लोकांना अजिबात थारा देत नाही. त्यामुळे असे कितीही नेते आले तरी आम्ही त्याची चिंता करत नाही असं उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. या आधी जिल्हा परिषदेत फक्त 3 शिवसेनेचे सदस्य होते. मात्र आत्ता तो आकडा 15 झाला आहे. पाचपट संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना अजून मजबूत करण्याची वाटचाल सुरू आहे. भाजपच्या गणेश नाईक यांनी पालकमंत्री देसाई यांना मालकमंत्री अशी टीका केली होती. त्याला देसाई यांनी उत्तर दिलं आहे. ही जनताच माझी मालक आहे. माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी सोबत जिल्हा परिषदेच्या सत्तेत जायचं की नाही या बाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे देसाई यांनी सांगितलं आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 10, 2026 07:20:49
Thane, Maharashtra:गोवेली जिवनदीप महाविद्यालय येथे एकुण 1204 व 3 अपंग विद्यार्थी बसले बारावीच्या परिक्षेला.. गुलाबाच फुल देऊन केले परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत... अँकर... संपूर्ण राज्यात आज बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून आज इंग्रजीचा पेपर आहे या निमित्ताने कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयामध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना संचालक रविंद्र घोडविंदे सर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करत त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गोवेली येथील परिक्षा केंद्रवर मुख्य केंद्र संचालक म्हणून प्रकाश तानाजी रोहणे सर काम पहाणर आहेत. या परीक्षा केंद्रावर परीसरातील 4 शाळांचे एकुण 1204 व 3 अपंग विद्यार्थी बसले आहेत. गोवेली कॉलेज, रायते विभाग हायस्कूल, होरायझन स्कूल रायते, एस.आर.डी. पब्लिक स्कूल निंबवली गुरवली येथील वबारावीचे विद्यार्थी या केंद्रात परिक्षेसाठी बसले आहेत. या ठिकाणी 50 परिवेक्षक, 5 रिलीव्हर,10 शिफाई व इतर एकणु 80 कर्मचारी कार्यरत आहेत. 49 वर्ग खोल्या एकुण 1204 विद्यार्थी आज बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेसाठी बसले आहेत. यंदा कॉपी वर नियंत्रण ठेवण्याकरिता सर्वच परिक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अशाच प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी देखील तैनात करण्यात आला आहे. बाईट-प्रकाश तानाजी रोहणे, केंद्र संचालक
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 10, 2026 07:18:46
Yavatmal, Maharashtra:शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत गोंधळ अद्याप संपलेला नाही, यवतमाळ जिल्ह्यात लाभार्थ्यांची आकडेवारी पडताळली असता त्यात पाचशेच्या घरात पुरुष लाभार्थी आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान ई केवायसी मध्ये महिलांनी लिंग नोंदणी करताना पुरुषा पुढील रकाना निवडल्याने घोळ झाला असावा असा अंदाज महिला व बालकल्याण अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सहा लाख 92 हजार 563 पात्र लाभार्थी महिला आहेत. यातील अनेक महिलांना योजनेचा पंधराशे रुपयांचा हप्ता नियमित मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या. ई केवायसी न केल्यामुळे किंवा चुकीची ई केवायसी केल्यामुळे तसेच अर्ज प्रक्रियेतील त्रुटी पडताळणी नीट न झाल्यामुळे 68 हजार 616 लाडक्या बहिणी लाभापासून वंचित आहे. यंत्रणेने पडताळणी केली असता त्यात पाचशेच्या जवळपास पुरुषांचे अर्ज आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शासनाने या सर्व लाभार्थ्यांचा लाभ थांबविला आहे. एकूणच सर्वसामान्य गरजू महिला ज्या या योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना फटका बसेला आहे. या लाडक्या बहिणींनी संताप व्यक्त करताचं, शासनाने 6 फेब्रुवारीला शासन निर्णय काढून ई केवायसी पोर्टल 31 मार्चपर्यंत सुरू ठेवण्याची मुदत वाढ दिली. लाभ थांबविण्यात आलेल्या महिलांनी नजरचुकीने चुकीची केवायसी केली असल्याची बाब पुढे आली. ज्यात महिलेच्या नावावर आधार कार्ड असताना लिंग नोंदणी पुरुषाची झाल्याचे दिसून येत आहे. त्या सर्वांची पुन्हा पडताळणी केल्या जात आहे, असे महिला व बालकल्याण अधिकारीांनी स्पष्ट केले. ज्यांची अद्याप ई केवायसी झाली नाही त्यांनी ती 31 मार्चपर्यंत करावी असे आवाहनही त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली, त्यावेळी धडाक्यात नोंदणी करून लाभार्थी महिला निवडण्यात आल्या. निवडणुकांनंतर सत्ता स्थापन झाल्यावर या योजनेमुळे राज्यावर मोठा आर्थिक बोजा आल्याचेही दिसून आले. त्यामुळे पडताळणी करून अनेक चुकीची नावे आता वगळल्या जात असली तरी योजनेतील घोळ मात्र अद्यापही संपलेला नाही.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 10, 2026 07:04:08
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात १२ वी च्या परीक्षेला सुरुवात अँकर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२ वीची परीक्षा आजपासून सुरू झाली. कोकण विभागीय मंडळाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रांवर ८ हजार २९२ विद्यार्थी तर रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ केंद्रांवर १५ हजार ७१० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दोन्ही जिल्हे मिळून यंदा एकूण २४ हजार २ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी म्हणजे सकाळी १०.३० वाजता केंद्रावर प्रवेश देण्यात आला. त्यापूर्वी कॉपीमुक्त परीक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना सूचना आणि त्यांची तपासणी करण्यात आली. कॉपीमुक्त अभियानासाठी भरारी पथके आणि सीसीटीवी व्यवस्था करण्यात आली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 10, 2026 07:02:54
Nagpur, Maharashtra:नागपूर उच्च न्यायालयाचे व्हिडिओ वापरावे - ग्रामपंचायतींवरील ‘प्रशासक राज’ला उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाने 17 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देत ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. - कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंच्यातवर प्रशासक नेमच्याचा राज्य शासनाच्या निर्णय होता.. - जानेवारी ते डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर निवडणूक न घेता प्रशासक नेमण्याच्या आदेशाला खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.. - 23 जानेवारीच्या शासनाचे आदेशामुळे लोकशाही व्यवस्थेवर आणि त्याच्या रचनेवर विपरीत परिणाम होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा होता.. - कार्यकाळ संपताच निवडणूक होणे आवश्यक, प्रशासक नेमत वर्षभर निवडणुका टाळण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ही केला होता.. - आदेशाची अंमलबजावणी तूर्त करू नये ,पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार
0
comment0
Report
Advertisement
Back to top