Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

अण्णाभाऊ साठे महामंडळाने अखेर मागण्या मान्य केल्या

Sept 12, 2025 07:05:32
Yavatmal, Maharashtra
बहुजन रयत परिषदेच्या मागण्यांना प्रतिसाद देत अण्णा भाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा. मणिष सांगोळे यांनी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. मातंग समाजातील तरुणांना २ ते ५ लाखांच्या कर्जासाठी केवळ एकच जामीनदार घ्यावा, नोंदणीकृत बँड दुकानदार व कलाकारांची जिल्हानिहाय यादी तयार करावी, थांबवलेली ऑनलाईन वेबसाईट त्वरित सुरू करावी तसेच उद्योजक प्रशिक्षण, शैक्षणिक कर्ज, जिल्ह्यात स्थायी व्यवस्थापक नेमणे अशा मागण्या मंजूर करण्यात आल्या. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अँड. कोमलताई साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर क्षिरसागर, विदर्भ जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे, महिला आघाडी अध्यक्ष हिराताई खडसे आदींसह बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Sept 12, 2025 10:18:57
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Winemart Feed on - 2C -------------------------------- Anchor - नांदेड शहरातील कलामंदिर या वर्दळीच्या भागातील रस्त्यावर दारुडे मद्य प्राशन करत असल्याने महिला आणि परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हे दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी या भागातील महीला, पुरुष थेट उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयात धडकले. कलामंदिर भागात नागरी वसाहतीत दारू दुकान आहे. या दुकानातून दारु घेउन भर रस्त्यावर मद्यपी दारु पितात. त्यामूळे महिला , तरुणी आणि विद्यार्थ्यांनीना त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर दारु पिऊन याच ठिकाणीं दारूच्या बाटल्या फेकल्या जातात. कचरा टाकला जातो. मुख्य रस्त्यावर थांबून दारुडे लघुशंका करतात. त्यामूळे येजा करणाऱ्या महिलांची कुंचबना होते. अनेक वेळा हे दारुडे महीला आणि तरुणीची छेड काढतात. त्यामूळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. हे दारु दुकान बंद करा, किंवा नागरी वसाहतीतून हटवा अशी रहिवाशांची मागणी आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा महीलानी दिला. Byte - महिला Byte - महिला Byte - महिला ----------------------------
4
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 12, 2025 10:05:44
3
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 12, 2025 10:05:19
Washim, Maharashtra:वाशिम: File:1209ZT_WSM_CITY_ROADS रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर : वाशिम शहरातून जाणाऱ्या जुन्या अकोला–नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील पुसद नाका चौक परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत.यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून जाताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.रेल्वे स्टेशनकडे जाणारे प्रवासी, कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारी वाहने, हॉस्पिटलमधील रुग्ण तसेच शाळकरी विद्यार्थी दररोज या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करत आहेत. खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा,अशी मागणी होत आहे.
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 12, 2025 09:46:35
Akola, Maharashtra:Anchor : काही दिवसांपूर्वी अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. या घटनेने अकोल्यात संतापाची लाट उसळली होती.अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून आरोपीला अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत होती. पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर फरार आरोपीला मध्य प्रदेशातील इंदोर येथे काल रात्री अटक करण्यात यश मिळवले. अत्याचाराच्या या घटनेच्या विरोधात आज अकोल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.या निषेध मोर्चात भाजपा खासदार अनुप धोत्रे, युतीतील मित्रपक्ष तसेच मोठ्या संख्येने हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.निषेध मोर्चामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण होते, मात्र पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. Byte : संग्राम भैय्या जगताप , आमदार, अहिल्यानगर
7
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 12, 2025 09:36:08
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणीच्या पाथरी तालुक्यातील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील ताटे गुरुजींची बदली झाल्याने विद्यार्थी आणि पालकांचा मोठा हिरमोड झालाय,त्यामुळे गावकऱ्यांनी ताटे सरची बदली रद्द करा म्हणून मागील दोन पण दिवसांपासून शाळेला कुलूप ठोकून शाळा कडे कोट बंद केलीय. जोपर्यंत ताटे सरला शाळेत आणणार नाहीत,तोपर्यंत शाळा उघडणार नसल्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिलाय... व्हीओ- व्हीओ- परभणीच्या पाथरी तालुक्यातील मुदगल ग्रामपंचायती अंतर्गत असलेली वंजारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील कांतराव ताटे या शिक्षकांची बदली झाली, मागील 10 वर्षांपासून असलेल्या ताटे सरांनी शाळेत देहबोली सारख उपक्रमशील शिक्षण दिल्याने शाळेची गुणवत्ता वाढून शाळेतील पटावरील संख्या वाढली,त्यांच्या कार्यालकाळात इंग्रजी शाळेतील विद्यार्थी या शाळेत आले. कांतराव ताटे सरांच्या कौशल्यपूर्ण शिक्षवणी आणि सामाजिक तळमळीमुळे लोक शाळा आणि शिक्षणाबद्दल जागरूक झाले,परिनामी गुणवत्ता आणि पटावरील संख्या वाढली,वंजारवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाच वर्ग असून दोन शिक्षक आहेत,त्यापैकी ताटे सरांची जिल्हाअंतर्गत लिंबा येथे बदली झाली,त्यामुळे येथील ग्रामस्थांनी शाळेला टाळ ठोकून काल पासून शाळा बंद केलीय. जोपर्यंत ताटे सरांची आमच्या शाळेत परत बदली होणार नाही,तोपर्यंत शाळा उघाडणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय, बाईट- योगेश ईखे- पालक बाईट-रमेश मुंडे- ग्रामस्थ व्हीओ- कांतराव ताटे यांच्या जागी संजय जाधव हे शिक्षक आले आहेत,तरी गावकर्यांनी शाळा कुलूप बंद ठेवलीय, दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होतय. पालक ताटे सरांना परत आना यावर ठाम आहेत,पण ताटे सरांची बद्दली ही त्यांच्या विनंतीवरून पोर्टलव्दारे झाली आहे,त्यांनी निवडलेल्या शाळेपैकीच एक शाळा त्यांना देण्यात आली असल्याचे शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांनी सांगितलय, बाईट- सुनील पोलास- प्राथमिक शिक्षणाधिकारी परभणी व्हीओ- दहा वर्ष झाल्याने ताटे सरांची नियमाने बदली होणार होतीच आणि ही कायदेशीर प्रक्रिया शिक्षण विभाग सांगतेय,त्यामुळे ताटे सरांना परत आणण शक्य नाहीये अस सांगतय, ताटे सरच शिक्षक हवेत असा अट्टहास धरल्याने नव्याने आलेले संजय जाधव सर कस शिकवतात. त्यांच्याकडे काही शिकवणीच्या कल्पक कल्पना आहेत का,ही संधी पालक त्यांच्याकडून हिरावून घेतायत का असा सवाल शाळा बंद मुळेउपस्थित होऊ लागलाय. आता शिक्षण विभाग पालकांची समजूत काढू शकेल की ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम राहतील हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे. गजानन देशमुख, झी मीडिया परभणी
12
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 12, 2025 08:50:50
12
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 12, 2025 08:38:09
kolhapur, Maharashtra:Ngp Mohan Bhagwat live u ने फीड पाठवलं ------ नागपूर (सरसंघचालक डॉ मोहन भागवत ) व्यक्तीसे लेके राष्ट्र के झगडे का कारण.. मुल कारण हमे चाहिये, मुझे चाहिये.. बाकी के दुनिया को क्या चाहिये इसका विचार मै नहीं करुंगा... भैया बहनो का रिश्ता है तू सुरक्षा के सवालं नही -.... सब अपने है.. सभी परमात्मा की संतान है इसलिये हम ये कथा सुनते है की.... एक रास्ते से जाने से लोक डरते थे ... क्यूकी वहा विषाली नाग वहा रहता था... जो जायेगा उसको काटता था..... इतना बडा था की लोग डर जाते ते मारना भी संभव नही था.. तथागत एक बार उस रस्ते से चले... लोगो ने समझा लेकिन उन्होने कहा की उन्हे उसी रास्ते से जाना है... परिस्थितीचे मुझे क्या लेना देना... -- परिस्थिती कैसे ही रहे मै कायम रहुंगा ये पता था -- जो झेलंना है बदलते रहता है कहानी संदेश तो पक्का है... अगर हमारे मे बैर नही है. तो कोई हमारा बैरी नही है -- विषले साप न तभी काटते जब आप कुछ करोगे.. -- उनको एक रेंज मे रखो.. वो कुछ नही करेगा -- अगर हमारे मन मे अपनापन है तो हमारा कोई बैरी नही है -- दुनिया मे लोगो को डर लगता है अगर ये बडा होगा तो हमारा क्या होगा... भारत बडा होगा तो हमारा स्थान कहा होगा... इसलिये लागू करो टेरिफ.. हमने तो कुछ किया नही... -- सात समुंदर पार आप है... हम यहा है.. कोई संबंध तो आता नही... लेकिन डर लगता है मे मेरा इसं चक्कर मै ये सारी बाते होती है... -- *अन्य व्यक्ति मोठी झाली तर मी लहान होईन, तशी भीती वाटते हा मानवी स्वभाव आहे. म्हणून मग भारतावर टॅरीफ लावण्यात येतात. हे कशाला होते? खरे तर तुम्ही इतक्या दूर साता समुद्राच्या पलीकडे राहता. मग भीतीचे काय कारण. तर, मी आणि माझ्या च्या चक्कर मुळे ही घडते, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केले आहे*
14
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 12, 2025 08:18:26
Ratnagiri, Maharashtra:कर्दे समुद्रकिनारी थार चा थरार... नसती हौस आली अंगाशी......* दापोली - तालुक्यातील प्रसिद्ध कर्दे समुद्रकिनारी काल संध्याकाळी साडेचार च्या सुमारास एक थार गाडी क्रमांक MH12 XT 1788 समुद्राच्या पाण्यातून भरधाव वेगाने चालवल्यामुळे नियंत्रण सुटून उलटली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडी जेसीबीच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, वारंवार सूचना करूनही पर्यटक समुद्राच्या किनाऱ्यावर गाड्या भरधाव वेगाने चालवत असतात. त्यामुळे अशा अपघातांची पुनरावृत्ती होत आहे. आजच्या घटनेमुळे किनाऱ्यावर उपस्थित नागरिकांमध्ये मोठा संताप पसरला. समुद्रकिनाऱ्यावर गाड्या घेऊन जाण्यावर तातडीने कडक बंदी घालावी. नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करावी.नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवावी.अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.या घटनेनंतर पुन्हा एकदा पर्यटकांच्या बेफिकीर वागणुकीमुळे स्थानिकांच्या सुरक्षिततेचा आणि समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याला धोका निर्माण होत असल्याबाबत स्थानिकांनी प्रशासनाने कटाक्ष ठेवण्याची मागणी केली आहे.
14
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 12, 2025 08:17:55
Ratnagiri, Maharashtra: अँकर:- कर्दे समुद्रकिनारी थार चा थरार... नसती हौस आली अंगाशी.. रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे समुद्रकिनारी पुन्हा एकदा बेफाम पर्यटकांचा प्रताप समोर आला आहे. काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास भरधाव वेगात समुद्रकिनारी धावणारी थार गाडी अचानक उलटल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पर्यटकांचा असा बेपर्वा आणि धोकादायक प्रकार केवळ जीवितास धोका निर्माण करत नाही, तर समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या इतर पर्यटकांनाही संकटात टाकतो. स्थानिक नागरिकांनी या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
12
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 12, 2025 08:17:44
Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा कब्जा.. पोलीस व पालिका पथक रिकाम्या स्कायवाक चे फोटो वरिष्ठांना पाठवत कारवाई केल्याचा दावा .. अस्तित्वात प्रवासी मात्र हैराण!. आरपीएफ, जीआरपी, पालिका पथक तैनात… पण फेरीवाल्यांनाच देतात पाठबळ! धक्कादायक बाब म्हणजे कर्मचारी पुढे कारवाईचे फोटो काढत असताना त्याच्या मागेच फेरीवाल्यांची दुकाने मांडत असल्याचे चित्र Anc.कल्याण रेल्वे स्टेशनं हा मुख्य रेल्वे स्टेशन म्हूणन ओळख आहे कल्याण रेल्वे स्थानकावर येण्या जाण्यासाठी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे स्याकवॉक च्या खालून जान म्हणजेच तारेवरची कसरत करत जावं लागतं आहे म्हूणन रेल्वे प्रवासी स्कायवॉक वापर करतात मात्र तेथे ही फेरीवाल्यानी कबज्जा केला आहे धक्कादायक बाब म्हणजे कारवाई करण्यासाठी स्टेशन परिसरात रेल्वे सुरक्षा बल ,आरपीएफ , जिआरपी पोलिस सह पालिका फेरीवाले पथक तैनात करण्यात आले आहे मात्र हेच कर्मचारी या फेरीवाल्यांना मदत करत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरती वायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे एक कर्मचारी स्कायवॉकवर उभा राहून आजूबाजूला कोणीही नसल्याचा फोटो वरिष्ठांना पाठवतो, मात्र फोटो काढत असताना त्याच्या मागे फेरीवाल्यांनी आपली दुकाने बिनधास्त थाटलेली पाहण्यास मिळत आहे . हा प्रकार पाहून आता 'कारवाई करणार कोण?' आणि 'या गर्दीतून प्रवाश्यांना सुटका मिळणार का?' असे संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.
12
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 12, 2025 08:00:46
Kolhapur, Maharashtra:Kop Devasthan AI PKG टीप - शिर्डी आणि कोल्हापूर एकत्रित पॅकेज. Feed:- Live U Anc:- राज्यातील धार्मिक स्थळ नेहमीच चोरट्यांच्या रडारवर असतात, इतकंच नव्हे तर गुन्हेगार देखील आपली ओळख लपून देवाचे दर्शन करतात. पण आता मात्र या चोरट्यांना त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देवस्थान परिसरात साधे फिरता देखील येणार नाही.. शिर्डी संस्थानने AI आधारित ‘पीपल काउंटिंग व फेस डिटेक्शन’ प्रणाली कार्यान्वित केलीय. तर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देखील लवकरच ही प्रणाली कार्यान्वित करणार आहे. GFX:- रेकॉर्डवरील गुन्हेगारांनो सावधान.. मंदिर परिसरात भक्तांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यानो तुम्ही देखील व्हा सावधान. कारण ओळख लपवून दर्शनाला जाणाऱ्यांची आता खैर नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच AI तंत्रज्ञान आधारित " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शनच्या माध्यमातून मिळणार तातडीने अलर्ट शिर्डीच्या साईबाबा संस्थाने AI तंत्रज्ञान आधारित "पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन " प्रणाली केली कार्यान्वित. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देखील लवकरच AI तंत्रज्ञान आधारित " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन " प्रणाली होणार कार्यान्वित. GFX Out VO 1:- राज्यातील धार्मिक स्थळांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार नेहमीच भेट देत असतात.. अनेक जण ओळख लपून तर काहीजण उघडपणे दर्शनाला येतात. हेच धार्मिक स्थळे चोरट्यांच्या रडावर देखील असतात.. गर्दीचा फायदा उठवून भक्तांच्या ऐवजावर डल्ला मारतात.. पण आता मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार आणि चोरट्यांची खैर असणार नाही. कारण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच AI तंत्रज्ञान आधारित " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शनच्या माध्यमातून मिळणार तातडीने अलर्ट मिळणार आहे. या प्रणालीमुळे मंदिरात विविध प्रवेशद्वारांनी प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची तंतोतंत आकडेवारी संस्थानला कळणार आहे.. यासोबतच महाराष्ट्रासह देशातील गुन्हेगारांचा डेटा या प्रणालीत संग्रहित केला जाणार असल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच संस्थानला तातडीने अलर्ट मिळणार आहे. शिर्डी मधील साई संस्थांनी या प्रणालीचा प्रत्यक्ष वापर सुरू केलाय. एका भाविकाच्या देणगीतून ही नवीन AI प्रणाली संस्थानने कार्यान्वित केली आहे.. Byte:- गोरक्ष गाडीलकर, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी VO 2:- 22 तारखेपासून शारदेय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थान प्रमाणेच करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात देखील AI तंत्रज्ञान प्रणालीचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे अंबाबाई मंदिर परिसरात ओळख लपून फिरणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि चोरट्यांना मोठा दणका बसणार आहे. Byte:- शिवराज नाईकवडी, सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती VO 3:- दरम्यान राज्यातील देवस्थान समिती मंदिर परिसर सुरक्षित करण्याच्या दृष्टीने AI तंत्रज्ञान आधारित " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन " प्रणाली कार्यान्वित करत असल्यामुळे भक्तानी देखील समाधान व्यक्त केल आहे. मंदिर परिसरात दर्शन घेत असताना विशेष करून महिलांना अलंकार जातील या भावनेने असुरक्षित वाटत होत. पण आता मात्र या महिलांना देखील देवाचे दर्शन घेत असताना सुरक्षित भावना निर्माण होणार आहे.. शिर्डीहून कुणाला जमदाडे यांच्यासह प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
13
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 12, 2025 08:00:25
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव: DHARA_TAYARI तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जोरदार तयारी नवरात्र उत्सवात देवीचा छबिना मिरवणूक निघणाऱ्या पालखी वाहनांची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात वाघ, सिंह, हत्ती, नंदी, गरुड, मोर, अशा विविध नऊ वाहनांवर नऊ दिवसात देवीचा निघतो पालखी छबिना तुळजापुरातील स्थानिक कलाकार करून पिढ्यानपिढ्या केलं जातं रंगरंगोटीचे काम Anc: तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. नवरात्र उत्सव कालावधीत देवीचा छबिना मिरवणूक वाघ ,सिंह, हत्ती घोडा, मोर, गरुड या वाहनांवर काढली जाते. त्याला रंगरंगोटी केली जात आहे. तुळजापुरातील पोतदार कुटुंबीय हे काम करत. दोन पिढ्यांपासून त्यांच्याकडून ही सेवा केली जात आहे. तुळजापुरातील या तयारीचा मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आढावा घेतला. Byte कीर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी धाराशिव
13
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 12, 2025 07:51:12
14
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 12, 2025 07:50:51
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1209ZT_CHP_SUDHIR_HELP ( single file sent on 2C)  टायटल:-- नागपूर महामार्गावर दुचाकीला वाहनाची धडक, महामार्गावर जखमीना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ताफा थांबवून केली मदत, पोलीस आणि वैद्यकीय पथके बोलावून जखमींना पोचविले रुग्णालयात, नागपूरच्या नियोजित दौऱ्यासाठी निघाले।होते आ. मुनगंटीवार, वेळीच मदत जखमींसाठी ठरली मोलाची अँकर:--चंद्रपूर- नागपूर महामार्गावर झालेल्या एका अपघातात जखमींसाठी आ. सुधीर मुनगंटीवार देवदूत ठरले. एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. जखमींना महामार्गावर बेवारस सोडून कारचालक पसार झाला. भद्रावती शहराच्या प्रवेश सीमेवर हा अपघात घडला. नागपुरात आपल्या नियोजित कार्यक्रमांसाठी दौऱ्यावर निघालेल्या माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा याच मार्गाने पुढे निघाला होता. आ. मुनगंटीवार यांनी हा अपघात बघताच संपूर्ण ताफा थांबवून जखमींना मदत केली. पोलीस व वैद्यकीय पथके बोलावून जखमींना रुग्णालयात पोचविले. आ. मुनगंटीवार यांनी तातडीने वेळीच केलेली मदत जखमींसाठी मोलाची ठरली.  आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
13
comment0
Report
Advertisement
Back to top