Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dipak Yangad
Yavatmal445001

राज्यस्तरीय कापूस-सोयाबीन शेतकरी परिषद ७ सप्टेंबरला वणी येथे

Dipak YangadDipak YangadSept 04, 2025 01:27:17
Yavatmal, Maharashtra:
वणी (जि. यवतमाळ) येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय कापूस-सोयाबीन उत्पादकांची विराट परिषद होणार आहे. या परिषदेला किसान आंदोलनाचे नेते का. राजन क्षीरसागर, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भाई तुकाराम भस्मे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष ऍड. हिरालाल परदेशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिषदेत शेतमालाचा कायदेशीर हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, विदेशी आयात बंदी, पिक विमा सुधारणा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पायाभूत सुविधा व शासकीय खरेदी केंद्र वर्षभर सुरू ठेवण्यासह विविध मागण्यांवर चर्चा होईल. ही परिषद यशस्वी करण्यासाठी वणी, मारेगाव, झरी आणि राळेगाव तालुक्यातील ४०० हून अधिक गावांत प्रचारासाठी किसान सभे
14
comment0
Report
Yavatmal445002

राष्ट्रसंत मोरारीबापू रामकथा पर्वाची जय्यत तयारी

Dipak YangadDipak YangadSept 03, 2025 07:34:24
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ : दारव्हा मार्गावरील चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ६ ते १४ सप्टेंबरदरम्यान राष्ट्रसंत मोरारीबापू यांच्या रामकथा पर्वाचे आयोजन होत आहे. दर्डा परिवाराच्या यजमानपदाखालील या सोहळ्यासाठी विविध समित्या, प्रशासन, पोलिस विभाग तसेच अनेक संस्था-संघटना कार्यरत असून वाहतूक, निवास, भोजन, आरोग्य व सुरक्षा यांची व्यापक तयारी सुरू आहे. विशेष बस व ऑटोसेवा उपलब्ध करून देण्यात आली असून रामकथेची पोथी शोभायात्रेद्वारे मंचावर नेली जाणार आहे. हा सोहळा ऐतिहासिक व अविस्मरणीय ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
10
comment0
Report
Yavatmal445001

लोहीत रांगोळी स्पर्धेत पायल पुंडला प्रथम क्रमांक

Dipak YangadDipak YangadSept 02, 2025 13:54:05
Yavatmal, Maharashtra:
लोही (ता. दारव्हा) – नवगणेश उत्सव मंडळ, माळीपुरा यांच्या वतीने आयोजित रांगोळी प्रदर्शन स्पर्धेत पायल गजानन पुंड हिने प्रथम क्रमांक पटकावला. नव्या विजय चंदनसे हिला द्वितीय तर पल्लवी संतोष भोजापुरे हिला तृतीय क्रमांक मिळाला. या वेळी परीक्षक म्हणून संगीता विजय मलमकर, सुनीता प्रकाश राऊत व उपसरपंच राजु देवराव हळदे उपस्थित होते. स्पर्धेला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 🎉
14
comment0
Report
Yavatmal445001

ई-पीक नोंदणीतील गती कमी; शेतकऱ्यांची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी

Dipak YangadDipak YangadSept 02, 2025 11:06:16
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ, दि. २ सप्टेंबर – जिल्ह्यातील ५.६४ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ १.२० लाख शेतकऱ्यांनीच ई-पीक नोंदणी पूर्ण केली असून ही टक्केवारी फक्त २१.२९ इतकी आहे. इंटरनेट, सर्व्हर समस्या व ऍपमधील तांत्रिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सध्या ई-पीक नोंदणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर असून, शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ती १ ऑक्टोबरपर्यंत वाढवावी तसेच कृषी सेवक व तलाठी यांची मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी शासनाच्या योजना, अनुदान, पीकविमा व नैसर्गिक आपत्तीग्रस्त भरपाईपासून वंचित राहतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. बाईट प्रा.पंढरी पाठे कृषी अभ्यासक,यवतमाळ
14
comment0
Report
Advertisement
Yavatmal445001

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

Dipak YangadDipak YangadSept 02, 2025 10:47:24
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज गौरी विसर्जनाच्या शुभमुहूर्तावरही कायम राहिला. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी ओला-दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
14
comment0
Report
Advertisement
Back to top