Back
AI से पुलिस ताकत: शिर्डी मंदिर में फेस डिटेक्शन लागू
PNPratap Naik1
Sept 12, 2025 08:00:46
Kolhapur, Maharashtra
Kop Devasthan AI PKG
टीप - शिर्डी आणि कोल्हापूर एकत्रित पॅकेज.
Feed:- Live U
Anc:- राज्यातील धार्मिक स्थळ नेहमीच चोरट्यांच्या रडारवर असतात, इतकंच नव्हे तर गुन्हेगार देखील आपली ओळख लपून देवाचे दर्शन करतात. पण आता मात्र या चोरट्यांना त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देवस्थान परिसरात साधे फिरता देखील येणार नाही.. शिर्डी संस्थानने AI आधारित ‘पीपल काउंटिंग व फेस डिटेक्शन’ प्रणाली कार्यान्वित केलीय. तर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देखील लवकरच ही प्रणाली कार्यान्वित करणार आहे.
GFX:-
रेकॉर्डवरील गुन्हेगारांनो सावधान..
मंदिर परिसरात भक्तांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यानो तुम्ही देखील व्हा सावधान.
कारण ओळख लपवून दर्शनाला जाणाऱ्यांची आता खैर नाही.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच AI तंत्रज्ञान आधारित " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शनच्या माध्यमातून मिळणार तातडीने अलर्ट
शिर्डीच्या साईबाबा संस्थाने AI तंत्रज्ञान आधारित "पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन " प्रणाली केली कार्यान्वित.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देखील लवकरच AI तंत्रज्ञान आधारित " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन " प्रणाली होणार कार्यान्वित.
GFX Out
VO 1:- राज्यातील धार्मिक स्थळांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार नेहमीच भेट देत असतात.. अनेक जण ओळख लपून तर काहीजण उघडपणे दर्शनाला येतात. हेच धार्मिक स्थळे चोरट्यांच्या रडावर देखील असतात.. गर्दीचा फायदा उठवून भक्तांच्या ऐवजावर डल्ला मारतात.. पण आता मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार आणि चोरट्यांची खैर असणार नाही. कारण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच AI तंत्रज्ञान आधारित " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शनच्या माध्यमातून मिळणार तातडीने अलर्ट मिळणार आहे. या प्रणालीमुळे मंदिरात विविध प्रवेशद्वारांनी प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची तंतोतंत आकडेवारी संस्थानला कळणार आहे.. यासोबतच महाराष्ट्रासह देशातील गुन्हेगारांचा डेटा या प्रणालीत संग्रहित केला जाणार असल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच संस्थानला तातडीने अलर्ट मिळणार आहे. शिर्डी मधील साई संस्थांनी या प्रणालीचा प्रत्यक्ष वापर सुरू केलाय. एका भाविकाच्या देणगीतून ही नवीन AI प्रणाली संस्थानने कार्यान्वित केली आहे..
Byte:- गोरक्ष गाडीलकर, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी
VO 2:- 22 तारखेपासून शारदेय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थान प्रमाणेच करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात देखील AI तंत्रज्ञान प्रणालीचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे अंबाबाई मंदिर परिसरात ओळख लपून फिरणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि चोरट्यांना मोठा दणका बसणार आहे.
Byte:- शिवराज नाईकवडी, सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
VO 3:- दरम्यान राज्यातील देवस्थान समिती मंदिर परिसर सुरक्षित करण्याच्या दृष्टीने AI तंत्रज्ञान आधारित " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन " प्रणाली कार्यान्वित करत असल्यामुळे भक्तानी देखील समाधान व्यक्त केल आहे. मंदिर परिसरात दर्शन घेत असताना विशेष करून महिलांना अलंकार जातील या भावनेने असुरक्षित वाटत होत. पण आता मात्र या महिलांना देखील देवाचे दर्शन घेत असताना सुरक्षित भावना निर्माण होणार आहे..
शिर्डीहून कुणाला जमदाडे यांच्यासह प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 12, 2025 11:01:420
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 10:49:461
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 12, 2025 10:49:164
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 12, 2025 10:34:271
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 12, 2025 10:33:471
Report
KJKunal Jamdade
FollowSept 12, 2025 10:32:513
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 12, 2025 10:18:579
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 10:16:016
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 12, 2025 10:05:4410
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 10:05:198
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 09:46:3513
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 09:36:0813
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 12, 2025 08:50:5012
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 08:38:0914
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 08:18:2614
Report