Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नवी मुंबई महानगरपालिका ने अगले साल टैक्स न बढ़ाने का फैसला लिया

SNSWATI NAIK
Feb 20, 2026 11:46:17
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेत सभागृह नेते पदी सागर नाईक तर विरोधीपक्ष नेते पदी विजय चौगुले यांची नियुक्ती करण्यात आलेय. महापौर सुजाता पाटील यांनी यासंदर्भातील घोषणा केली. यासोबतच पुढील वर्षासाठी कोणतीही कारवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्वसदस्यांच्या संमतीने सदर ठराव पारित करण्यात आलेAqu.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Feb 20, 2026 13:51:02
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 20, 2026 13:35:22
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. याच्यात विवादास्पद स्टेटस ठेवणाऱ्याला ही अटक करण्यात आलेली आहे. तीन आरोपींना पोलिसांनी कालच अटक केली होती. चौथ्या आरोपीला गुजरात राज्यातील सोनगड येथून अटक करण्यात आलेली आहे. लग्न मंडपात झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार संशयितना अटक केली आहे. पिंपळनेर शहरातील गोसावी समाजातील एका लग्न सोहळ्यातील साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या वादात तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातील बिजासनी कॉलनीत राहणाऱ्या विजय गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. विवाह सोहळ्याच्या दोन दिवस आधीच सोनगडच्या काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर चिथावणीखोर स्टेटस ठेवल्याने दोन्ही बाजूने अंतर्गत धुसफूस सुरु होती. दरम्यान हळदीच्या दिवशी सेाहळा सुरु होण्याआधी या स्टेटसचा जाब विचारण्यासाठी गेले असता दोन्ही गटात वाद झाला. यावेळी अचानकपणे तीन ते चार जणांनी वधुकडील लोकांवर चाकूने वार केले. या आल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेनंतर नंतर गुजरात कडे पळून जाणाऱ्या तिघांना पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चितावणीखोर स्टेटस ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी सोनगड इथून अनिल गोसावी याला अटक केली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 20, 2026 13:18:12
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात येणाऱ्या महादुला–चिंचोली मार्गावरील पुलावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाखाली कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारमधील 8 प्रवाशांपैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, सावली ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महादुला–चिंचोली मार्गावरून गुरुवारी सायंकाळी MH-CB 7973 क्रमांकाची कार जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पुलावरून खाली पडली. या कारमध्ये 4 महिला, 4 पुरुष आणि दीड वर्षाचे एक बालक प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना बाहेर काढून पारशिवनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे, तर किरकोळ जखमींवर पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 20, 2026 13:15:15
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 20, 2026 11:55:06
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- केंद्रीय प्लास्टिक प्रशिक्षण संस्था सिपेटतर्फे चंद्रपूरात आयोजित झाली ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा अँकर:-- केंद्रीय प्लास्टिक प्रशिक्षण संस्था सिपेट चंद्रपूर यांच्या वतीने आज ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि चक्रीय अर्थव्यवस्था’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर येथे सिपेट स्थापना झाल्यापासून प्लास्टिक उद्योगपूरक विविध नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने रसायने आणि खते मंत्रालय, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, भारत सरकार यांच्या सौजन्याने हे राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहाराज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या चर्चासत्रात प्लास्टिक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन, आधुनिक पुनर्वापर तंत्रज्ञान, शाश्वत विकासाची दिशा तसेच चक्रीय अर्थव्यवस्थेची संकल्पना यावर तज्ज्ञ मार्गदर्शन केले गेले. CSIR-NEERI, VNIT नागपूर, CIPET तसेच प्लास्टिक उद्योग क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होऊन उद्योग आणि समाजामध्ये शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. उद्योग क्षेत्रातील इच्छुक उमेदवार, विद्यार्थी, संशोधक, पर्यावरण तज्ञ व संबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 20, 2026 11:49:22
Kalyan, Maharashtra:कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकास प्रकल्पांसाठी तब्बल पाच हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौर्‍यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. दुसरा पलावा पूल, मेट्रो-१२ प्रकल्प, तिसरा पत्री पूल, कल्याण पूर्व पश्चिम जोडणारा वालधुनी पूल आणि कल्याण रिंगरोड विकास प्रकल्पांची सविस्तर पाहणी करण्यात आली. विशेषतः रिंगरोड प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी येत्या चार पाच दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कल्याण डोंबिवली परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता हे पूल व रस्ते प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. मेट्रो-१२ प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, पूर्व पश्चिम जोडणी सुलभ होणार आहे. लवकरात लवकर ही सर्व कामे पूर्ण करून कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीमधून दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. विकासकामांमुळे परिसराच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर कल्याण डोंबिवली करांच्या सेवेत १०० नवीन ई बस लवकरच दाखल होतील अशीही माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 20, 2026 11:47:17
Chandrapur, Maharashtra:कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून झालेल्या क्षुल्लक वादात मुलाने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव जगदीश पेटकुले (वय 36) असून मृत महिलेचे नाव सुमित्राबाई पेटकुले (वय 65) आहे. आरोपीची पत्नी दोन महिन्यांपूर्वी मुलांना घेऊन माहेरी गेल्याने तो आईसोबतच राहत होता. काल रात्री वाद झाल्यानंतर आरोपीने आईला अमानुष मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुमित्राबाई यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपीला दारूचे व्यसन असून दारूच्या नशेतच त्याने हे कृत्य केल्याची परिसरात चर्चा आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 20, 2026 11:32:04
Pandharpur, Maharashtra:मोहिते पाटील यांना कुठलेही छत सहजासहजी उपलब्ध होणार नाही. गरज पडली तेव्हा सावली शोधली आणि पुन्हा सोडून दिली, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा खासदार मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिंदे सेनेची त्यांची जवळीक वाढल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे सुपडा साफ करून म्हणणाऱ्यांचाच आता सुपडा साफ झालेला आहे. त्यांना आता कुठेही सहजासहजी शत उपलब्ध होणार नाही. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण याला प्राधान्य आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना काय वाटते हा माझा विषय नाही. देसाई यांच्याशी संवाद साधणार का याला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उप मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधतील आणि मार्ग निघेल असा विश्वास ग्रामविकास मंत्री गोरे यांनी व्यक्त केला आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 20, 2026 11:23:32
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेत अंतर्गत वाद चिघळल्याचे चित्र समोर आले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांची कोल्हापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर काही शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिवहन समितीमध्ये विशाल देवकुळे यांचे नाव डावलण्यात आल्याचा आरोप करत संतप्त शिवसैनिकांनी सुनील मोदी यांच्या घरी जाऊन जाब विचारला. या वेळी परिसरात मोठा गोंधळ उडाला. “सुनील मोदी यांनी शिवसेनेचा घात केला, ते शिवसेनेत राहून काँग्रेसचे हस्तक झाले आहेत,” असा आरोप विशाल देवकुळे आणि त्यांच्या समर्थकांनी केला. “कोल्हापुरातून उद्धव ठाकरे की शिवसेना मोदींनी संपवली,” असा गंभीर आरोपही करण्यात आला. या घटनेमुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले असून, आगामी राजकीय घडामोडींवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर सुनील मोदी यांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 20, 2026 11:20:44
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिलेतील मंगळवेढा तालुक्यातील परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर देताना दहा विद्यार्थ्यांना पकडले. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयामध्ये आज दहावीचा पेपर सुरू असताना केंद्र संचालक यांनी शाळेमध्ये तपासणी करत असताना सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी येथील दहा बहिष्ठ विद्यार्थी तोतया म्हणून मराठीचा पेपर देत असल्याचं आढळून आलं या केंद्रातील वेगवेगळ्या परीक्षा खोलीमध्ये हे विद्यार्थी पेपर देत असताना आढळून आले यानंतर केंद्र संचालकांनी बोर्डाच्या नियमानुसार कारवाई केली असून मंगळवेढा पोलिसांना मध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 20, 2026 10:34:23
0
comment0
Report
Advertisement
Back to top