Back
पिंपळनेर के शादी समारोह में तीन लोगों की हत्या, चार आरोपी गिरफ्तार
PPPRASHANT PARDESHI
Feb 20, 2026 13:35:22
Dhule, Maharashtra
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. याच्यात विवादास्पद स्टेटस ठेवणाऱ्याला ही अटक करण्यात आलेली आहे. तीन आरोपींना पोलिसांनी कालच अटक केली होती. चौथ्या आरोपीला गुजरात राज्यातील सोनगड येथून अटक करण्यात आलेली आहे. लग्न मंडपात झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार संशयितना अटक केली आहे. पिंपळनेर शहरातील गोसावी समाजातील एका लग्न सोहळ्यातील साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या वादात तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातील बिजासनी कॉलनीत राहणाऱ्या विजय गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. विवाह सोहळ्याच्या दोन दिवस आधीच सोनगडच्या काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर चिथावणीखोर स्टेटस ठेवल्याने दोन्ही बाजूने अंतर्गत धुसफूस सुरु होती. दरम्यान हळदीच्या दिवशी सेाहळा सुरु होण्याआधी या स्टेटसचा जाब विचारण्यासाठी गेले असता दोन्ही गटात वाद झाला. यावेळी अचानकपणे तीन ते चार जणांनी वधुकडील लोकांवर चाकूने वार केले. या आल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेनंतर नंतर गुजरात कडे पळून जाणाऱ्या तिघांना पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चितावणीखोर स्टेटस ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी सोनगड इथून अनिल गोसावी याला अटक केली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 20, 2026 15:35:400
Report
PNPratap Naik1
FollowFeb 20, 2026 14:00:360
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 20, 2026 13:51:020
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 20, 2026 13:45:490
Report
AKAMAR KANE
FollowFeb 20, 2026 13:18:120
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 20, 2026 13:15:150
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 20, 2026 12:34:090
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:55:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 20, 2026 11:49:220
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:47:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 20, 2026 11:46:170
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:32:040
Report
PNPratap Naik1
FollowFeb 20, 2026 11:23:320
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:20:440
Report